कामगार अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन
12:29 PM Sep 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : शहरातील कामगारांनी गुरुवारी (दि. 25) कामगार नेते अॅड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वाखाली कामगार उपायुक्मत डी. जी. नागेश व अधिकारी राजेश जाधव यांची भेट घेऊन निवेदन दिले. कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, विवाहासाठी आर्थिक मदत, वैद्यकीय उपचारासाठी मदत, मयत झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत सरकारकडून मिळवून द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना अभिषेक शहापूर, गोपाळ पाटील आदी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement