जिल्ह्यातील मेंढपाळांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : गेल्या 2-3 महिन्यात विविध ठिकाणी मेंढ्यांच्या चोरींच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे त्यांच्या समस्येत वाढ झाली आहे. मेंढ्यांना विशेष संरक्षण देऊन चोरी झालेल्या मेंढपाळांच्या कुटुंबीयांना मदत करावी. तसेच यामुळे मेंढ्यांच्या चोरीच्या घटनांवर आळा घालून चोरट्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच राज्य सरकारने मेंढ्या, गुरे संरक्षण कायदा अंमलात आणण्याची मागणी हालूमत महासभेच्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
राज्यभरातील मेंढपाळाला अनेक समस्यांना तेंड द्यावे लागत आहे. मेंढपाळांना मेढ्यांना घेऊन भटकंती करावी लागते. मात्र मेंढ्यांच्या जर चोऱ्या झाल्या तर त्यांच्यावर संकटांचा डोंगर उभा राहणार असून मेंढीपालनावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो. यासाठी जिल्ह्यातील सर्व मेंढपाळांना स्वतंत्र बंदुकीचे प्रशिक्षण देऊन बंदूक परवाना प्रक्रिया सोपी करावी. तसेच चोरट्यांना लवकर जेरबंद करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी मारुती मर्डी, मल्लप्पा भुताळी, संतोष जीरण्णवर, रामसिद्ध बिरण्णवर, यल्लप्पा गोडची यांच्यासह मेंढपाळ उपस्थित होते.