कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गणेशपुरीच्या नागरिकांचे उपअधीक्षकांना निवेदन

01:21 PM Oct 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

म्हापसा : म्हापसा गणेशपुरी येथील डॉ. घाणेकर यांच्या बंगल्यावरील दरोड्याचा तपास गतीने सुरू आहे. दरोडेखोरांच्या शोधात पोलिसांची पथके कार्यरत असून दरोडेखोरांना लवकरच गजाआड केले जाईल, असे आश्वासन म्हापसा पोलिसस्थानकाचे उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांनी गणेशपुरीतील रहिवाश्यांना दिले आहे. या नागरिकांनी गणेशपुरी परिसरातील गस्त वाढवावी, सुरक्षा व्यवस्था कडक करावी, बस शेड, परिसरात आऊट पोस्ट सुरू करून तेथे कायमस्वऊपी पोलिसांची नियुक्ती करावी अशी मागणी उपअधीक्षकांकडे केली आहे. नागरिकांच्या शिष्टमंडळाने उपअधीक्षकांना निवेदन दिले आहे. यावेळी शिष्टमंडळात नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर, आशिष शिरोडकर, डॉ. गुऊदास नाटेकर, दत्ताराम बिचोलकर, प्रा. सुभाष नाईक, वरद नाटेकर, दीपक गोवेकर, सोमनाथ नाईक आदींचा समावेश होता.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article