For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गजेन्द्रगड प्रकरणी तातडीच्या हस्तक्षेपासाठी निवेदन

12:44 PM Dec 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
गजेन्द्रगड प्रकरणी तातडीच्या हस्तक्षेपासाठी निवेदन
Advertisement

बेळगाव : गदग जिह्यातील गजेन्द्रगड येथील होली पॅमिली स्कूल परिसरात पाद्री निवासस्थान आणि लहान चर्चच्या बांधकामावरून निर्माण झालेला वाद राज्यातील वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचला आहे. बेळगाव डायोसिसचे प्रमुख, बिशप डेरेक फर्नांडिस यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर आणि कायदा मंत्री एच. के. पाटील यांना तातडीच्या हस्तक्षेपासाठी मंगळवारी निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, होली पॅमिली स्कूल, बेळगाव डायसिस बोर्ड ऑफ एज्युकेशन अंतर्गत आणि बेथनी सिस्टर्स यांच्या संस्थेतर्फे मागील 11 वर्षांपूर्वी स्थापन झाले असून अलीकडेच पहिल्या बॅचचे यशस्वी आयोजन करण्यात आले. मुख्य शाळेचे व्यवस्थापन डायसिसकडे आहे, तर बालवाडी विभाग बेथनी सिस्टर्स चालवतात.

Advertisement

धर्मांतराचा आरोप निराधार

शाळेशी संबंधित पाद्री, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या छोट्या पॅथॉलिक समुदायाच्या धार्मिक गरजांसाठी, रामापूर ग्रामपंचायत हद्दीतील बिगरशेती निवासी जमिनीवर पाद्री निवासस्थान (प्रेस्बटिरी) आणि एक छोटे चर्च बांधण्याचे नियोजन केले होते. ग्राम पंचायतीने 10 मार्च 2025 रोजी दोन्ही बांधकामांसाठी परवानगी देणारा ठराव मंजूर केला होता आणि 24 जुलै रोजी अधिकृत परवानगीही दिली होती. 30 ऑक्टोबर रोजी बांधकामास सुऊवात झाली होती आणि प्राथमिक पायाभरणीचे काम पूर्ण झाले होते. मात्र एका गटाने धर्मांतराचा आरोप करत बांधकाम रद्द करण्याच्या मागणीचे पत्र ग्राम पंचायतीकडे दिल्यानंतर प्रकल्प अचानक थांबवण्यात आला. मात्र हे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि गृहमंत्री डॉ. परमेश्वर यांनी याबाबत आपण लक्ष देण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी आमदार आयव्हान डिसोझा, लुईस रॉड्रिग्स आणि फादर प्रमोद कुमार हे त्यांच्यासोबत होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.