गृहीत धरू नये; आमची ताकद काय आहे हे दिसेल
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उदय भोसले यांचे प्रतिपादन
सावंतवाडी | प्रतिनिधी
नगरपालिका ,जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकतीनिशी सज्ज झाला आहे. महायुतीच्या घटक पक्षाने आम्हाला गृहीत धरू नये. आमची ताकद काय आहे हे दिसेल. येत्या आठवड्याभरात पक्षाचे संपर्क मंत्री हसन मुश्रीफ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सुरेश गवस,एमडी सावंत, उमाकांत वारंग ,असलम खलील ,संदीप पेडणेकर, सत्यजित धारणकर , सावंत ,रिद्धी परब, धरणी देसाई ऑगस्टीन फर्नांडिस ,महेंद्र देसाई, विलास पावसकर, दीपक देसाई ,मानसी देसाई ,रंजन निर्मळ, गुरुदत्त कामत ,रोहन परब, विलास पावसकर ,सुरेश शंकर, शिवाजी जंगले, सुरेश शंकर, सोनू जंगले, सुहास गवस, सत्यप्रकाश गावडे ,यशवंत जाधव, वसंत परब, राम लाखे ,नितेश पाटील, तुषार भोसले ,सतीश नाईक. आधी उपस्थित होते यावेळेस श्री उमाकांत वारंग यांनी महायुतीतील भाजप -शिवसेना पक्ष आम्हाला गृहीत धरून आहे . आम्ही गनिमी काव्याने लढाई जिंकू आणि काहीही घडवू शकतो . आमचा एक कार्यकर्ता खूप झाला असे ते म्हणाले.