कर्नाटक दलित प्रगतीपर सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
वार्ताहर/अगसगे
बेंगळूर भाजपचे आर. आर. नगरचे आमदार मुनिरत्न यांनी परिशिष्ट जाती-जमातीला आणि चलवादी समाजाबद्दल निंदा करून एका समाजाला खाली दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.त्यामुळे कर्नाटक सरकारच्या राज्यपालांनी त्यांचे आमदारपद रद्द करावे म्हणून कर्नाटक दलित प्रगतीपर सेनेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना निवेदन देण्यात आले. सध्या आमदार मुनिरत्न यांना पुढील कारवाईसाठी पोलिसांनी अटक केली आहे. परिशिष्ट जाती व चलवादी समाजाबद्दल अतिशय निंदनीय भाषेत कंत्राटदार चलुवराजू यांना अर्वाच्य भाषेत बोलण्यात आलेला ऑडिओ दि. 13 रोजी समाज माध्यमावर व्हायरल झाला.
पैशांच्या व्यवहाराबद्दल कंत्राटदार चलुवराजू यांना जातीवाचक भाषेचा वापर करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे एका लोकप्रतिनिधीला ही बाब अशोभनीय असून या राज्यपालांनी त्यांचे आमदारपद त्वरित बरखास्त करण्याचा आदेश द्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कर्नाटक दलित प्रगतीपर सेनेच्यावतीने देण्यात आला आहे.यावेळी संघटनेचे अध्यक्ष नागेश कांबळे, जिल्हाध्यक्ष शिवपुत्र मैत्री, सेपवाड समूहाचे अध्यक्ष संतोष मैत्री, डीवायएस जिल्हाध्यक्ष सुनील, दलित संघर्ष समिती राज्य सहसंचालक गिऱ्याप्पा कोलकार, सुरेश कांबळे, अजित कांबळे राजकमल मैत्री, राजू तळवार, कस्तुरी भावी, अजित कांबळे आदी उपस्थित होते.