Satara News : मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन; साताऱ्यात वीज कर्मचाऱ्यांचा इशारा
साताऱ्यात महावितरण कर्मचाऱ्यांचा संताप उफाळला
by : इम्तियाज मुजावर
सातारा : महावितरण, महापारेषण आणि महाजेनकोमधील विविध मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, साताऱ्यातल्या महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अभियंता, अधिकारी आणि कृति समितीने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कर्मचारी संघटनांनी ऊर्जा मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे स्पष्टपणे चेतावणी दिली आहे की, शासनाने तत्काळ चर्चा बोलवून प्रलंबित मागण्यांवर निर्णय घेतला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
या मुख्य मागण्यांमध्ये कृति समिती पुनर्स्थापन, अधिकाऱ्यांवरील अन्यायकारक बदली आदेश मागे घेणे, गोसेक कर्मचाऱ्यांच्या सेवा अटी निश्चित करणे, तसेच महावितरण कंपनीच्या कामकाजात पारदर्शकता आणणे कृति समितीने म्हटले आहे की, शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा न करता, त्यांचे प्रतिनिधी मंडळांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे
यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून, जर शासनाने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर वीजपुरवठा सेवा आंदोलनाच्या मार्गाने जाईल," असा स्पष्ट इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
.
दरम्यान, या मागण्यांचे पत्र ऊर्जा विभाग, महावितरण आणि महापारेषणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले आहे.आता शासन या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.