महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांच्या राज्य दौऱ्याला प्रारंभ

09:59 AM Apr 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आज अमित शहांची बेंगळुरात सभा, चन्नपट्टणमध्ये रोड शो : कुमारस्वामींशी करणार चर्चा

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

लोकसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांकडून राज्यात प्रचाराला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा मंगळवारी राज्य दौऱ्यावर येत आहेत. सकाळी 11 वाजता ते बेंगळूरच्या राजवाडा मैदानावर भाजप कार्यकर्त्यांच्या सभेत सहभागी होतील. त्यानंतर रामनगर जिल्ह्यातील चन्नपट्टणमध्ये त्यांचा रोड शो होणार आहे. निधर्मी जनता दलाशी युती केल्याने ते सकाळी बेंगळुरात आल्यानंतर निवडणुकीविषयी निजद प्रदेशाध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी यांच्याशी चर्चा करणार आहेत.

दक्षिण कर्नाटकातील 14 जिल्ह्यांमध्ये 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. येथील तीन मतदारसंघांमध्ये निजदचे उमेदवार तर 11 मतदारसंघांत भाजपचे उमेदवार निवडणूक लढवतील. त्यामुळे युतीमध्ये एकसंघपणा टिकविण्यासाठी अमित शहा यांचा कर्नाटक दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या दौऱ्यावेळी बेंगळुरातील एका हॉटेलमध्ये नाश्त्याच्या निमित्ताने कुमारस्वामी लोकसभा निवडणुकीविषयी चर्चा करतील. भाजप आणि निजद नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारे मतभेद निर्माण होऊ नयेत, यासंबंधी उभयतांमध्ये चर्चा होऊ शकते.

दरम्यान, सकाळी 11 वाजता भाजपच्या कार्यकर्त्यांची सभा बेंगळुरातील राजवाडा मैदानावर होणार आहे. सुमारे 5 लोकसभा मतदारसंघातील 5 हजार कार्यकर्त्यांशी अमित शहा संवाद साधतील. त्यानंतर ते चन्नपट्टणमध्ये रोड शो करतील. वेळेची उपलब्धता पाहून बेळगाव, दावणगेरे, तुमकूर, चिक्कबळ्ळापूर, चित्रदुर्ग, बिदर जिल्हा भाजप कार्यकारिणीच्या सदस्यांशी निवडणुकीसंबंधी चर्चा करतील.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article