जिल्ह्यातील दोघांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर! शिक्षकदिनी मुंबईत वितरण
शिक्षकांवर जिह्यातून अभिनंदनाचा वर्षाव
सांगली प्रतिनिधी
जिह्यातील दोघा शिक्षकांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने सोमवारी या पुरस्काराची घोषणा केली. कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची जि.प. शाळा नं दोनचे शिक्षक अमोल किसन हंकारे आणि हरिपूर येथील कोंडाबाई साळुंखे हायस्कूलचे शिक्षक विठ्ठल महादेव मोहिते यांचा पुरस्कार शिक्षकांमध्ये समावेश आहे. गुरूवारी पाच सप्टेंबर रोजी मुंबईत या पुस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
निस्वार्थ भावनेने सेवा देणाऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने 192-62 पासून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार देण्यास सुरूवात केली आहे. या पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा रोख दहा हजाराचे बक्षीस, शिल्ड देवून गौरव करण्यात येतो. 2023-24 च्या पुरस्काराची सोमवारी शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक 39, आदिवासी क्षेत्रातील 19, दिव्यांग 1 आदी इतर मिळून 109 शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये जिह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची जि.प. शाळा नं. दोनचे शिक्षक अमोल किसन हंकारे आणि हरिपूर येथील कोंडाबाई साळुंखे हायस्कूलचे शिक्षक विठठल महादेव मोहिते यांचा पुरस्कार शिक्षकांमध्ये समावेश आहे.
पुस्कार प्राप्त शिक्षक हंकारे यांनी तंत्रज्ञानाच्या गैरवापराची, वाईट परिणामांची चर्चा होत असतानाच या विषयातली ताकद ओळखून या माध्यमातून चांगल्या गोष्टी करायला शिकवू, हा ध्यास घेऊन अॅपच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली, तर खेळासाठी होणारा मोबाइलचा वापर कमी होईल, यासाठी त्यांनी निरनिराळया एप्सची निर्मिती केली. मराठी रनर, बालवाडी, स्कॉलरशिप, प्रज्ञाशोध, मराठी वर्डसर्च, शालेय कविता ही अॅप्स त्यांनी तयार केली. स्कॉलरशिप परीक्षेचे ‘क्विझ अॅप’ तयार करून आजपर्यंत दहा लाख अधिक लोकांना त्याचा फायदा झाला आहे.
अॅपच्या या दुनियेतील ‘बालवाडी’ नावाच्या एपमध्ये दहा वेगवेगळे घटक असून त्यामध्ये धूळपाटी, स्ट्रोकसह अक्षर लेखन, अक्षर गिरवणं यांसाठी मुळाक्षरं, अंक, महिने, वार, शरीराचे अवयव हे घटक समाविष्ट केले आहेत. मराठी शब्दसंपत्ती वाढावी आाणि वाचन क्षमता विकसित व्हावी, यासाठी अमोल हंकारे यांनी ‘मराठी वर्डसर्च’ हे अॅप तयार केलं आहे. ‘शालेय कविता’ या अॅपमध्ये मराठी व इंग्लिश पाठ्यापुस्तकातील कविता समर्पक चालित दिल्या आहेत. ऑननलाइन आणि ऑफलाइन चालणाऱ्या या एपला एकूण 392 रिह्यू आणि 4.6 हजार स्टार मिळाले आहेत. शिक्षक मोहिते यांनी यापूर्वी राष्ट्रीय स्तरावर पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत.