कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

साताऱ्यात राज्यस्तरीय महिला टी- 20 चा थरार

01:58 PM Mar 02, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सातारा : 

Advertisement

राजधानी साताऱ्यात ऋणानुबंध फाउंडेशन आणि सातारा डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त 30 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रातील पहिली राज्यस्तरीय महिला टी-20 क्रिकेट लीग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे होणाऱ्या या स्पर्धेत सातारा संघासह राज्यातील नामांकित महिला क्रिकेट संघांचा समावेश असणार आहे.

Advertisement

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते ऋणानुबंध फाउंडेशन, सातारा डिस्ट्रिक क्रिकेट असोसिएशन आणि श्री. . शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र समूह यांच्या उपस्थितीत आज स्पर्धेसाठीच्या टी-शर्ट्सचे आणि स्पर्धेच्या बॅनरचे इनोग्रेशन उत्साहात झाले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, ऋणानुबंध फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष अंजली शिंदे, सेक्रेटरी आशा भिसे, खजिनदार अंजना जठार, पुनम इंगवले, नीता सणस, विद्या किर्दत, तेजस्विनी केसरकर, समिता कुदळे, नयना कांबळे, सुहासिनी निकम, सुनिता शिंदे, इर्शाद बागवान, सुजित जाधव, सचिन माने, प्रशांत साळुंखे, विनोद वांद्रे, धनंजय जाधव, शेखर पवार, प्रशांत शहा, प्रशांत पवार, भालचंद्र निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली आणि पुणे या महिला संघांचा समावेश असणार आहे. विजेत्या संघाला रोख 51 हजाराचे पहिले बक्षीस, ट्रॉफी आणि इतर खूप सारी बक्षिसे दिली जाणार आहेत. व्दितीय क्रमांकाला रोख रु. 25000 रुपये व चषक, वैयक्तिक पारितोषिकांमध्ये वूमन ऑफ दी मॅचसाठी ट्रॉफी, बेस्ट फिल्डर - रोख रु. 3000 व चषक, बेस्ट बॅटसमन-रोख रु.3000/- व चषक, बेस्ट बॉलर- रोख रु. 3000 /- व चषक तसेच बूमन ऑफ दी सिरीजसाठी रोख 5000/- व चषक असे बक्षीस देण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article