For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रजासत्ताकदिनी राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य स्पर्धा

01:58 PM Jan 08, 2025 IST | Radhika Patil
प्रजासत्ताकदिनी राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य स्पर्धा
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

 शिवसेना ठाकरे गट प्रणित महाराष्ट्र रिक्षा चालक सेना व निवृत्ती चौक रिक्षा मित्र मंडळ यांच्यावतीने 26 जानेवारी रोजी सकाळी 12 वाजता शिवाजी पेठेतील निवृत्त चौकात राज्यस्तरीय रिक्षा सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे जिल्हा प्रमुख राजू जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. अखंड 25 वर्ष ही स्पर्धा घेतली जात आहे. यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमही राबविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राजू जाधव म्हणाले, रिक्षा स्पर्धा ‘अ’ व ‘ब’ अशा दोन गटात होणार आहे. यामध्ये 2021 ते 2025 मधील उत्पादीत असणारी रिक्षा आणि 2021 पूर्वीच्या रिक्षा असे दोन गट आहेत. या दोन गटातील दोन रिक्षा पैकी एक रिक्षेला ‘महाराष्ट्र रिक्षा सुंदरी’ म्हणून चांदीचे मेडल व मानाचा फेटा देऊन गौरविण्यात येणार आहे. तर दुसऱ्या रिक्षास ‘कोल्हापूर रिक्षा सुंदरी’ म्हणून सन्मानचिन्ह व मानाचा फेटा देऊन गौरविण्यात येणार आहे.

Advertisement

देशभरातील रिक्षा व्यवसायिकांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. ज्यांना या स्पर्धेत भाग घ्यावयाचा आहे. त्यांनी शिवाजी पेठेतील निवृत्त चौकातील जयहिंद हॉटल येथे 25 जानेवारीपर्यंत प्रवेश फी भरून नोंदणी करणे आवश्यक असल्याचेही राजेंद जाधव यांनी सांगितले. यावेळी चंद्रकांत भोसले, संदीप जगताप, वसंत पाटील, सादीक मुल्लाणी, अतुल पोवार, मोहन बागडी आदी उपस्थित होते.

                                      रोप्य महोत्सवानिमित्त सत्कार, ड्रेसचे वाटप

यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष असून खास रिक्षा चालकांसाठी स्पर्धे दरम्यान परवाना व बॅचधारक असणाऱ्यांचा लकी ड्रॉ काढला जाणार आहे. यामधील 25 लकी रिक्षा चालकांना खाकी ड्रेसचे कापड दिले जाणार आहे. स्पर्धेतील सहभागी सर्व रिक्षाचालकांना रिक्षासह रॅम्पवर बोलवून मानचा फेटा व ट्रॉफी देऊन सन्मानित केले जाणार आहे. प्रामाणिक व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार केला जाणार आहे. सुमारे 100 अनाथ मुलांना ड्रेसचेही वाटप होणार आहे.

             स्पर्धेत ही होणार प्रत्याक्षिके

दोन चाकांवर रिक्षा चालविणे, रिव्हर्स रिक्षा चालविणे

                                         साडेचार लाखांची बक्षिसांचे वाटप

स्पर्धे दरम्यान सुमारे साडे चार लाखांची बक्षिस वितरण होणार आहेत. यामध्ये रोख 1 लाखांची बक्षिस आहेत. तर ट्रॉफी, सन्मानचिन्हांचाही समावेश आहे. दोन गटात प्रत्येकी प्रथम क्रमांकाच्या रिक्षेला रोख 25 हजार 25 व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक रोख 15 हजार 25 व ट्रॉफी, तृतीय क्रमांकास रोख 10 हजार 25 व ट्रॉफी आणि उत्तेजनार्थ 5 हजार 25 व ट्रॉफी दिली जाणार आहे.

Advertisement
Tags :

.