मनीषा सन्नाईक यांना राज्यस्तरीय महिला भूषण पुरस्कार प्रदान
बेळगाव : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान मुंबई ( महाराष्ट्र) तर्फे मनीषा सन्नाईक यांना राज्यस्तरीय महिला भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ व अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या शुभहस्ते प्रधान करण्यात आला. मनीषा सन्नईक यांनी मद्रास विद्यापीठातून पदवीत्तर शिक्षण घेतल्यानंतर आपल्या सुखी संसारा बरोबरच बेळगाव येथील स्थानिक वृत्तवाहिनी मध्ये वृत्त निवेदक म्हणून काम केलं कालांतराने त्या के एल इ वेणू धनी कम्युनिटी रेडिओ वर मराठी प्रोग्राम एज्युकेटिव्ह निवेदक म्हणून रुजू झाल्या त्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्र कर्नाटकातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मध्ये शास्त्रीय गायिका शितल धर्माधिकारी, अभिनेत्री अरुंधती नाग, अभिनेत्री वर्षा उसगावकर, केंद्रीय प्रसारण मंत्री राजवर्धन सिंह राठोड, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, ज्येष्ठ वकील उज्वल निकम, मंत्रालय सचिव ज्ञानेश्वर मुळे आदी मान्यवरांच्या मुलाखतीच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत विचार पोहोचवण्याचं काम केले बेळगाव ,कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांनी तळघळपर्यंत विविध कार्यशाळा राबवल्या त्यामधून त्यांनी स्वच्छता, महिलांचे आरोग्य, मुलांची घ्यावयाची काळजी, बालसंगोपन, बचत गट यासारखे उपक्रम राबवून सामाजिक जाणीव जागृती कार्यक्रम यशस्वी केले या त्यांच्याउल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना हा राज्यस्तरीय महिला भूषण पुरस्कार प्रदान देऊन गौरवण्यात आले
साहित्यिक लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश सोमनाथ जाधव यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. टाऊन हॉल उल्हासनगर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास उल्हासनगर महापालिका आयुक्त आयए अधिकारी, आमदार कुमार एलांनी, डॉ अजिज शेख, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस काँग्रेसचे सोनिया धामी, शिवसेना महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते किरण सोनवणे, आरपीआय महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अण्णासाहेब रोकडे ,राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष भरत राजवानी, आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत विजय सुरवाडे, मंत्रालय कामगार युनियनचे भरत वानखेडे, डॉ.मनोहर बनसोडे, अभिनेते अशोक फळदेसाई, महागायिका निशाताई, शाहीर रामानंद उगले, गायिका गायत्री शेलार, लावणी सम्राज्ञी हिंदवी पाटील, अभिनेते आनंद हाबळे, आदि मान्यवर व रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश जाधव, कार्याध्यक्ष दादू चव्हाण, उपाध्यक्ष पप्पू जाधव, सचिव राकेश जाधव, सदस्य बबलू कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात अभिनेतेअशोक सराफ व अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या गाजलेल्या चित्रपटातील गाण्यावर कलाकारांनी नृत्याविष्कार सादर केले त्यासाठी प्रचंड प्रतिसाद मिळाला सूत्रसंचालन अभिनेते सुनील जगताप, अभिनेते आनंद हाबळे व प्रफुल्ल केदारे यांनी केले