महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजपकडून राज्य प्रभारींची घोषणा

06:31 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

24 राज्यांमध्ये पक्षाने नियुक्त केले प्रभारी : संबित पात्रा, विनोद तावडेंना मिळाली मोठी जबाबदारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भाजपने शुक्रवारी 24 राज्ये-केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रदेश प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती केली आहे. कर्नाटकचे प्रदेश प्रभारी म्हणून भाजपने राधामोहन दास अग्रवाल यांची नियुक्त केली आहे. तर सहप्रभारी म्हणून सुधाकर रेड्डी जबाबदारी सांभाळतील. बिहार भाजपकरता विनोद तावडे यांना प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर दीपक प्रकाश हे सहप्रभारी असतील. गोव्याकरता भाजपने आशीष सूद यांची प्रभारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.

आमदार अशोक सिंघल यांना अरुणाचलप्रदेशचा प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले. तर श्रीकांत शर्मा यांना हिमाचल प्रदेशचे प्रभारी तसेच संजय टंडन हे सहप्रभारी असतील. संबित पात्रा यांना ईशान्येतील राज्यांकरता संयोजक आणि व्ही. मुरलीधरन यांना संयुक्त संयोजक म्हणून भाजपने नियुक्त केले आहे.

अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी रघुनाथ कुलकर्णी यांची भाजपने प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. नितिन नवीन हे छत्तीसगडमधील भाजपचे प्रभारी असणार आहेत.  दादरा नगर हवेली आणि दमण तसेच दीवकरता दुष्यंत पटेल यांची प्रभारी म्हणून नेमणूक झाली आहे.

हरियाणात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे, या पार्श्वभूमीवर भाजपने सतीश पुनिया यांची प्रभारीपदी तर सुरेंद्र सिंह नागर यांची सहप्रभारीपदी नियुक्ती केली आहे. हिमाचल प्रदेशकरता श्रीकांत शर्मा हे प्रभारी तर संजय टंडन हे सहप्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये ऑगस्ट महिन्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता असून तेथे भाजपने तरुण चुघ यांची प्रभारी तर आशीष सूद यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे. केरळमध्ये प्रकाश जावडेकर हे भाजपचे प्रभारी  म्हणून जबाबदारी सांभाळतील. तर अपराजिता सारंगी यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

तरुण चुघ यांना लडाखचे प्रभारी म्हणूनही पक्षाने जबाबदारी सोपविली आहे. मध्यप्रदेश डॉ. महेंद्र सिंह हे प्रभारी तर सतीश उपाध्याय हे सहप्रभारी म्हणून भाजपच्या वतीने जबाबदारी सांभाळतील. मणिपूरमध्ये पक्षाचे प्रभारी म्हणून डॉ. अजित यांना जबाबदारी देण्यात आली. तर केरळमधील नेते अनिल अँटोनी यांना मेघालय तसेच नागालँड या राज्यांमध्ये भाजपचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मिझोरममध्ये देवेश कुमार हे भाजपचे प्रभारी असतील. ओडिशा या राज्याकरता भाजपने विजयपाल सिंह तोमर यांची प्रभारी तर लता उसेंडी यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती जाहीर केली आहे.

पु•gचेरी या केंद्रशासित प्रदेशात पक्षाचे प्रभारी म्हणून निर्मल कुमार जबाबदारी सांभाळतील. पंजाबकरता भाजपने विजय रुपाणी यांना प्रभारी तर नरिंदर सिंह यांना सहप्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. सिक्कीममधील भाजपचे प्रभारी म्हणून दिलीप जयसवाल यांच्या विश्वास दाखविण्यात आला आहे. उत्तराखंडकरता भाजपने दुष्यंत कुमार गौतम यांना प्रभारी तर रेखा वर्मा यांना सहप्रभारी म्हणून नेमले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article