For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्य मानव हक्क आयोगाची खानापूरला भेट

10:41 AM Nov 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्य मानव हक्क आयोगाची खानापूरला भेट
Advertisement

बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या सूचना

Advertisement

खानापूर : राज्य मानव हक्क आयोगाच्या पथकाने शुक्रवारी खानापूर तहसीलदार कार्यालयाला भेट देवून येथील विश्रामधामात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी राज्य मानव हक्क आयोगाचे एस. के. वंटेगोडी यांच्या पथकाने खानापूर तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांना बैठकीत सूचना केल्या. येथील वसतिगृहांची पाहणी केली. तालुक्यातील घनदाट जंगलातील आमगावसह इतर गावातील समस्यांच्या बाबतीन राज्यपातळीवर चर्चा झाली होती. या दुर्गम भागातील ग्रामस्थांचे स्थलांतर करण्याचेही सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत मानव हक्क आयोगाने येथील परिस्थितीचा आढावा घेण्यासंदर्भात दौरा केला होता. या दौऱ्यात राज्य मानव हक्क आयोगाचे एस. के. वंटेगोडी यासह इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता. या भेटीप्रसंगी तहसीलदार प्रकाश गायकवाड, ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी आणि जिल्हा पंचायतीचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.