शाश्वत विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध
मुख्यमंत्री सिद्धरामय्या : बेंगळुरात उच्चस्तरीय गोलमेज परिषद : कर्नाटकातील संधीचा उपयोग करून घेण्याचे उद्योजकांना आवाहन
बेंगळूर : उद्योजकता आणि शाश्वत विकासाला चालना देणारे वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. विधानसौध येथे मंगळवारी यूएस इंडिया बिझनेस कौन्सिलच्या ग्लोबल बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मिशनच्या उच्चस्तरीय गोलमेज परिषदेत ते बोलत होते. कर्नाटक राज्य व्यापार आणि व्यवसायासाठी खुले आहे. कर्नाटकातील संधीचा उपयोग करून घेण्याचे आवाहनही त्यांनी उद्योजकांना केले. सिद्धरामय्या पुढे म्हणाले, आम्ही आयटीबीटी, एरोस्पेस यासह कोणत्याही क्षेत्रात जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि तुमच्या सहकार्याने उपाय शोधण्यासाठी तयार आहोत. कर्नाटक हे उत्तम संधी उपलब्ध करून देणारे राज्य आहे.
आम्ही आमच्या लोकांच्या आणि जागतिक समुदायाच्या भविष्यासाठी त्यांचा उपयोग करण्यास वचनबद्ध आहोत. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे कर्नाटक आणि अमेरिका यांच्यात परस्पर फायदेशीर संबंध निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात गुंतवणुकीसाठी उत्सुक असताना राज्यात उद्योग सुरू करण्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मुक्तपणे स्वागत करतो. समृद्धी भागीदारी आणि प्रगतीच्या भविष्याकडे आपण एकत्र पाऊल टाकूया. आज आम्ही केलेली चर्चा ही कर्नाटक आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील मजबूत आणि गतिमान भागीदारीचा पुरावा आहे. गोलमेजावर आम्ही केवळ व्यवसायाच्या संधींवर चर्चा करत नाही. आम्ही एक ब्लू प्रिंट तयार करत आहोत जी पूर्वीपेक्षा अधिक जोडलेली असेल आणि भविष्यात अधिक समृद्धी आणेल, असेही सिद्धरामय्यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकची राजधानी बेंगळूर ही भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखली जाते. तंत्रज्ञान क्रांतीमध्ये भारत आघाडीवर असून नावीन्यपूर्ण, उद्योजकता आणि अत्याधुनिक संशोधन आणि विकासाचे केंद्र म्हणूनही आघाडीवर आहे. जगातील आघाडीच्या आयटी कंपन्या, बायोटेक उद्योजक आणि स्टार्टअप्सचे घर आहे.सुरळीत व्यवसाय आणि शाश्वत विकासाला पूरक अशी आमची धोरणे आखण्यात आली आहेत, असेही मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले. बैठकीत ग्रामविकास मंत्री प्रियांक खर्गे, सरकारच्या मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश, अतिरिक्त मुख्य सचिव एल. के. अतिक, आयटीबीटी विभागाचे प्रधान कार्यदर्शी एकरुप कौर, मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव गोविंदराजू आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.