कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्टेट बार कौन्सिल अध्यक्षांची वकिलांच्या समस्या निवारणासाठी भेट

11:25 AM Apr 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर वकील संघटना अध्यक्ष अॅड. ईश्वर घाडी यांनी  मांडल्या समस्या

Advertisement

वार्ताहर/नंदगड

Advertisement

खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. ईश्वर घाडी यांनी कर्नाटक स्टेट बार कौन्सिलचे अध्यक्ष एस. एस. मित्तलकोड तसेच प्रधान कार्यदर्शी के. एन. सुनीता यांची बेंगळूर येथे भेट घेऊन वकिलांच्या समस्या निवारणासाठी विविध मागण्या केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने टॅक्स केसीस, मोटार व्हेईकल रिलीज केसेस, ज्युनिअर वकिलांना मासिक वेतन तसेच सर्व बँकांच्या केसीस न्यायालयाकडे वर्ग करणे आदीसह अन्य मागण्यांचा समावेश आहे. यावेळी अॅड. ईश्वर घाडी म्हणाले, प्रत्येक जिह्याला भारतीय न्याय संहिता (बि. एन. एस)  कायद्यासंदर्भात कार्यशाळा भरवून त्या संदर्भात माहिती देण्याचे सांगितले. खानापूर तालुक्यामध्ये सध्या वाढलेली लोकसंख्या व सध्या असलेल्या नोटरींची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. खानापूर तालुक्यात कमीत कमी दहा नोटरी असणे गरजेचे आहे. यामध्ये महिला नोटरींचा समावेश करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दिवसेंदिवस वकिलांची वाढती संख्या पाहता त्यांना केसेस मिळणे गरजेचे आहे. तसेच जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्याकडे प्रलंबित असलेले आरपीएस मॅटर कोर्टाला वर्ग करण्याची त्यांनी विनंती केली.

मानधनामध्ये वाढ करणार

यावेळी स्टेट बार कौन्सिलचे अध्यक्ष एस. एस. मित्तलकोड यांनी निवेदनाचा गांभीर्याने विचार करून भविष्य काळामध्ये वकिलांच्या कल्याणासाठी व त्यांच्या वारसदारांना मिळणाऱ्या मानधनामध्ये वाढ करण्याचे आश्वासन दिले. खानापूर वकील संघटनेतर्फे स्टेट बार कौन्सिलिंगचे अध्यक्ष मित्तलकोड व प्रधान कार्यदर्शी के. एन. सुनीता यांचा विशेष सत्कार खानापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड ईश्वर घाडी यांनी केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article