कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गावातच स्वत:चा व्यवसाय सुरू करा

11:59 AM Jan 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जीआयटीच्या पदवीदान समारंभात माजी विद्यार्थी शीतलकुमार दोशींचे मार्गदर्शन

Advertisement

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisement

विद्यार्थी कौशल्याच्या आधारावरच भावी जीवनात यशस्वी होणार आहेत. वाढ, प्रगती व यश हे या प्रक्रियेतील टप्पे आहेत. गुणवत्ता मिळविलेल्या विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वत:चा व्यवसाय सुरू करावा. जेवढी मेहनत व्यवसाय टिकविण्यासाठी कराल तितकाच परतावा आपल्याला मिळणार आहे. तुम्ही काय विचार करता, त्या पद्धतीनेच तुमची प्रगती होत असते. त्यामुळे मोठा विचार करा व यश मिळविण्यासाठी अहोरात्र मेहनत करा, असा सल्ला पुणे येथील स्पार्कलाईन इक्विपमेंट प्रा. लिमिटेडचे एम. डी. व जीआयटी कॉलेजचे माजी विद्यार्थी शीतलकुमार दोशी यांनी दिला.

कर्नाटक लॉ सोसायटीच्या गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा सातवा पदवीदान समारंभ शुक्रवारी पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर बेंगळूर येथील जी. एम. सायंटिफिक इनोव्हेशन अँड रिसर्च सेंटरचे सीईओ डॉ. यु. चंद्रशेखर, कर्नाटक लॉ सोसायटीचे अध्यक्ष अनंत मंडगी, जीआयटी गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन प्रमोद कटवी, चेअरमन राजेंद्र बेळगावकर, प्राचार्य डॉ. एम. एस. पाटील, उपाध्यक्ष आर. बी. भंडारे, डी. व्ही. कुलकर्णी, सेक्रेटरी व्ही. जी. कुलकर्णी यासह जीआयटीचे सदस्य उपस्थित होते.

कौशल्ये, गुणवत्तेच्या आधारे देश मोठा करा

शीतलकुमार दोशी म्हणाले, सध्या माहितीचे आदानप्रदान मोठ्या प्रमाणात केले जात आहे. लहान शहरांपर्यंत सर्व सेवासुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे नोकरीसाठी भटकंती करत मोठ्या महानगरांकडे जाण्यापेक्षा स्वत:च्या गावात राहून एखादा व्यवसाय सुरू करावा. स्वत:च्या व्यवसायामुळे आपल्यामध्ये किती क्षमता आहे? हे आपल्याला समजून येते. भारत ही एक मोठी संधी असून इतर देशांचेही आपल्याकडे लक्ष आहे. त्यामुळे आपण आत्मसात केलेली कौशल्ये, गुणवत्तेच्या आधारे देश मोठा करूया, असे विचार त्यांनी मांडले.

जीआयटी कॉलेजचे नाव जगभरात पोचवा

अध्यक्ष अनंत मंडगी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत यापुढील काळातही जीआयटी कॉलेजचे नाव जगभरात पोचविण्याचे आवाहन केले. राजेंद्र बेळगावकर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. एम. एस. पाटील यांनी महाविद्यालयाचा अहवाल मांडला. स्तुती कुलकर्णी हिने ईशस्तवन केले. मान्यवरांच्या हस्ते इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, एमटेक, एमबीए, एमसीए उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सुवर्णपदक, रौप्यपदक व कांस्यपदक देऊन गौरव केला. सूत्रसंचालन प्राजक्ता पाटील व वैष्णवी यांनी केले.

अस्तित्व दाखवून देण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

डॉ. यु. चंद्रशेखर यांनी विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाविषयी माहिती देत सध्या औद्योगिक क्षेत्रामध्ये कसा बदल घडत आहे? याची माहिती दिली. दिवसागणिक तंत्रज्ञान बदलत असून स्मार्ट सिस्टीम विकसित होत आहे. काही वर्षांपूर्वी केवळ ठराविक व्यक्तीच युपीआयद्वारे पेमेंट करत होत्या. परंतु, आज लाखो लोक हजारो कोटी रुपयांची उलाढाल युपीआयवरून करत आहेत. तसेच इलेक्ट्रिक वाहनांमुळे वाहनक्षेत्रात मोठे बदल घडले आहेत. ही विद्यार्थ्यांसाठी संधी असून यामध्ये संशोधन करून आपले अस्तित्व दाखवून द्या, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#tarunbharat_official
Next Article