महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा
कोल्हापूर :
आगामी काळात होणाऱ्या महापालिका निवडणुकीत कोल्हापूर महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी तयारीला लागावे, असे आवाहन भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले. नागाळा पार्क येथील जिल्हा कार्यालयात झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्ता बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हाध्यक्ष जाधव म्हणाले, भाजपाच्या सदस्य नोंदणी अभियानातंर्गत 8800002024 या क्रमांकावर मिस कॉल देऊन तसेच नमो अॅपद्वारे सदस्य नोंदणी करता येते. प्रत्येकाने आपल्या बूथ, मंडल स्तरावर जास्तीत जास्त नोंदणी करावी. भाजप सदस्य नोंदणी अभियान हे माध्यम असून आगामी महापालिका निवडणूक महत्वाची आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याची जिद्द, मतदार संघात संपर्क वाढवत सर्वांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन केले.
प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, भाजपा कार्यकर्त्यांच्या क्रियाशीलतेचा उपयोग करून प्रत्येक प्रभागात सर्वांनी सामाजिक उपक्रम राबवावेत. सदस्य नोंदणी अभियानाची निकोप स्पर्धा सर्वांमध्ये व्हावी. त्याचबरोबर महापालिकेमध्ये सर्वात जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी भाजपा कोणत्याही बाबतीत कमी पडणार नाही याची हामी जाधव यांनी दिली.
बैठकीला अशोक देसाई, गायत्री राउत, डॉ राजवर्धन, राजू मोरे, शैलेश पाटील, विशाल शिराळकर, विशाल शिराळे, गिरीश साळोखे, सागर रांगोळे, रविंद्र मुतगी, सुनील पाटील, संग्राम जरग, दिलीप रनवरे, दिलीप मेत्राणी, सचिन सुराणा, कोमल देसाई, प्राची कुलकर्णी, लता बर्गे, शारदा पोटे, अश्विनी गोपूगडे, तेजस्विनी पार्टे, सुजाता पाटील, विद्या बनछोडे, रीना पालनकर आदी उपस्थित होते.