For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यस्तरीय मानांकित टेबल टेनिस स्पर्धेला प्रारंभ

10:24 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
राज्यस्तरीय मानांकित टेबल टेनिस स्पर्धेला प्रारंभ
Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्हा टेबल टेनिस संघटना आयोजित विनया यशोधर कोटियन् यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय मानांकित टेबल टेनिस स्पर्धेत उद्घाटन दिवशी 19 वर्षांखालील मुलांच्या गटात अभिनव मूर्ती यांनी विजेतेपद पटकाविले. बेळगाव क्लबच्या सभागृहात आयोजित विनया कोटियन् स्मूर्ती राज्यमानांकित टेबल टेनिस स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डी.पी.स्कूलच्या उपमुख्याध्यापक सिस्टर इलीमा, रेणूका शुगर्सचे उपाध्यक्ष गोविंद मिसाळ, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष विनय बाळेकाई, उद्योजक दीपक यकुंडी, अॅड. यशोधरा कोटियन् व स्पर्धा सचिव संगम बैलूर आदी उपस्थित होते. मान्यवरांनी टेबल टेनिस टेबलला पुष्पहार घालून उद्घाटन केले. या स्पर्धेत विविध गटातून जळपास 400 मानांकित टेटेपटूंनी भाग घेतला आहे. 19 वर्षांखालील मुलांच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विभास व्ही.जी. विरुद्ध बी. आर. गौरव (11-9, 15-13, 11-13, 13-15, 11-8) अशा सेटमध्ये तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अभिनव मूर्ती विरुद्ध आर्या जैन (11-8, 11-4, 11-9) अशा सेटमध्ये पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत  अभिनव मूर्तीने विभास व्ही.जी.चा (7-11, 11-9, 11-9, 11-5, 11-8) अशासेटमध्ये पराभव करुन विजेतेपद पटकाविले.

Advertisement

Advertisement
Tags :

.