विविध प्रकारच्या मलखांब स्पर्धेला प्रारंभ
बेळगाव : अनगोळ येथील विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हा आयोजित राज्यस्तरीय व क्षेत्रीय मलखांब व रोप मल्लखांब स्पर्धाना प्रारंभ झाल्या. संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून विमल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव, विद्याभारती राज्य शारीरिक प्रमुख देवेंद्रजी ,संत मीरा शाळेच्या उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, विद्याभारती जिल्हा शारीरिक प्रमुख सी. आर. पाटील, मलखांब प्रमुख अनुराधा पुरी, मलखांब प्रशिक्षक सुरज देसुरकर, मयुरी पिंगट, चंद्रकांत तुर्केवाडी, बसवंत पाटील या मान्यवरांचे हस्ते मलखांब पोलचे पुष्पर घालून व श्रीफळ वाढून किरण जाधव यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
याप्रसंगी किरण जाधव म्हणाले की पारंपरिक भारतीय खेळाचे पुन्हा पुनर्जीवन होत आहे. भारतीयांना एक समाधानकारक बाब असून भारतीय खेळांना पुन्हा नव्या पिढीसमोर आदर्श घालण्याचे काम विद्याभारती व संत मीरा शाळेने पुढाकार घेतल्याने त्यांचे अभिनंदन केले तसेच या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मलखांब पंच संकेत पाटील, स्वप्निल पाटील, प्रफुल्ल पाटील, किरण पावसकर, शामल दड्डीकर, धनश्री सावंत, बापूसाहेब देसाई, जयसिंग धनाजी, आलिना पठाण, साईकिरण शिंदे, गणेश माळवी ,सान्वी पाटील, यश पाटील शिवकुमार सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. क्षेत्रीय स्पर्धेत कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्याच्या प्राथमिक व माध्यमिक मुला मुलींच्या संघाचा समावेश आहे.