महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

म्हापशात डांबरीकरणास प्रारंभ

12:30 PM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

म्हापसा : म्हापसा येथील गणेशपुरी वीज उपकेंद्राजवळील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाचा शुभारंभ उपसभापती तथा स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी म्हापसा नगराध्यक्ष प्रिया मिशाल, प्रभाग नगरसेवक डॉ. नूतन बिचोलकर, साईनाथ राऊळ, विराज फडके उपस्थित होते. मागील दीड वर्षापासून भूमिगत वाहिनी घालण्याचे काम सुरू करण्यात आले होते. त्यामुळे सगळे रस्ते खणण्यात आल्याने येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. पावसाळ्यात हे ख•s अधिकच त्रासदायक ठरले. विरोधक रस्त्याचे राजकारण करत असत. हे काम दोन टप्प्यात केले जाणार आहे. गणेशपुरी वीज उपकेंद्रापासून सुरू होऊन संपूर्ण शहरातील रस्ते हॉटमिक्स केले जाणार आहेत. त्यासाठी 7 कोटी 8 लाख रुपये खर्च येणार असल्याचे उपसभापती डिसोझा यांनी यावेळी सांगितले. वीज केंद्रातून 15 वाहिन्या रस्त्याखालून गेल्या आहेत. रस्ता खणून केवल टाकल्या आहेत. ज्याचा त्रास गणेशपुरीतील लोकांना सहन करावा लागला. त्यामुळे लोकांकडून सतत तक्रारी येत असत. आता याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांनी आमदारांचे आभार मानले आहेत. स्थानिक नगरसेवक डॉ. बिचोलकर यांनीही रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article