महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

निकाल वाढीसाठी प्रयत्नशील रहा

11:08 AM May 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या मुख्याध्यापकांना सूचना ; सीआरपी-बीआरसींची बैठक

Advertisement

बेळगाव : नवीन शैक्षणिक वर्षाला शुक्रवार दि. 31 पासून प्रारंभ होत आहे. निकाल वाढीसाठी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच प्रयत्न सुरू करा. मोरारजी देसाई, नवोदय विद्यालय या निवासी शाळांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करा. तसेच स्वागत समारंभादिवशीच त्यांना पाठ्यापुस्तके द्या, अशा सूचना शहर गटशिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांनी दिल्या. मंगळवारी बी. के. मॉडेल शाळेच्या सभागृहात शहरातील सीआरपी, बीआरसी, इसीओ व मुख्याध्यापक यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला सरकारी, अनुदानित, तसेच खासगी शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. शहर विभागातील शाळांना 65 टक्के पुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वितरण करावे, यासोबत पुढील वर्षभराचा आराखडा तयार ठेवावा, अशा सूचना करण्यात आल्या. बैठकीला बीआरसी समन्वयक आय. डी. हिरेमठ, मुदकनगौडर यांसह इतर अधिकारी उपस्थित होते. यावर्षी दहावी निकालात शहर विभागाने प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच एनएमएमएस स्पर्धा परीक्षेमध्येही शहर विभागाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून सर्वाधिक शिष्यवृत्ती मिळविली. याबद्दल केएसपीएससी या शिक्षक संघटनेच्यावतीने गटशिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ व बीआरसी समन्वयक आय. डी. हिरेमठ यांचा जिल्हाध्यक्ष जयकुमार हेब्बळ्ळी व बाबू सोगलन्नावर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Advertisement

दूध-अंड्यांचे होणार वितरण

यापुढे शालेय विद्यार्थ्यांना दुधासोबतच रागीचे वितरण केले जाणार आहे. सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस रागीचे वितरण केले जाणार आहे. तर मंगळवार व गुरुवारी 150 मिली दुधाचे वितरण केले जाणार आहे. याबरोबरच आठवड्यातील दोन दिवस अंडी अथवा चिक्की व केळी याचे वितरण होणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवसापासून मध्यान्ह आहार दिला जाणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article