महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव-कुरिहाळ मार्गावर बससेवा सुरू करा

10:47 AM Oct 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विद्यार्थ्यांची गैरसोय : परिवहनकडे निवेदनाद्वारे मागणी

Advertisement

बेळगाव : विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी बेळगाव-कुरिहाळ मार्गावर बससेवा सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन परिवहनचे डीटीओ के. के. लमाणी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. कुरिहाळ-बेळगाव मार्गावर बससेवेची कमतरता असल्याने बोडकेनहट्टी, हंदिगनूर, चलवेनहट्टी आणि अगसगा येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. या गावातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी बेळगावला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र या मार्गावर बसेसचा तुटवडा असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे. विद्यार्थ्यांकडे बसपास असूनदेखील खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे आर्थिक फटकाही बसत आहे. त्यामुळे बेळगाव-कुरिहाळ मार्गावर बससेवा सुरू करावी, यासाठी अॅड. एन. आर. लातूर यांच्या नेतृत्वाखाली परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article