For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli | स्त्री भ्रूणहत्त्या रोखण्यासाठी धाडसत्र सुरू करा : रूपाली चाकणकर

04:25 PM Oct 16, 2025 IST | NEETA POTDAR
sangli    स्त्री भ्रूणहत्त्या रोखण्यासाठी धाडसत्र सुरू करा   रूपाली चाकणकर
Advertisement

                                स्त्री भ्रूणहत्येला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय

Advertisement

सांगली : स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी धाड सत्र सुरू करा, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी बुधवारी सांगलीत बोलताना दिल्या. महिलांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांची तळागाळातील महिलांपर्यंत जनजागृती करा. तसेच त्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. असेही आदेश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात महिलांविषयक विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आबडे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, महिला व बालविकास अधिकारी वर्षा पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

चाकणकर म्हणाल्या, पीसीपीएनडीटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने धाडसत्र सुरू करावे. बालविवाह होऊ नये यासाठी जनजागृती करावी. टोल फ्री क्रमांक ११२, १०९१, १०९८ या क्रमांकाची माहिती मुली, महिलांना द्यावी जेणेकरून त्यांना तक्रार करणे सोयीचे होईल. महिलांसाठी स्वच्छतागृह, हिरकणी कक्ष इत्यादी सोयीसुविधा संबंधित कामाच्या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात. महिला स्वच्छतागृहांच्या केअरटेकरही महिला कामगार असाव्यात. स्वच्छतागृहात पाण्याची सुविधा असावी, असे सूचित केले.

त्या म्हणाल्या, सीएसआर फंडातून शाळांमध्ये मुलींना सॅनिटरी नॅपकिन, वेंडिंग, बर्निंग मशीनची उपलब्धता करून द्यावी. महिलांसाठी संबंधित ठिकाणी चेजींग रूमचीही व्यवस्था शंभर टक्के करावी. महिलांच्या तक्रारीच्या प्रकरणात केसेसच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. कोणत्याही अडचण येत असेल तर अशी प्रकरणे शिफारसी करून आयोगाला पाठवावी जेणेकरून शासनाकडून मार्गदर्शन उपलब्ध करून देता येईल.

शाळा, कॉलेजच्या ठिकाणी प्रार्थनेच्या वेळेस बीट मार्शल, भरोसा सेल, निर्भया पथक, आदिंनी त्यांच्या कामकाजाबाबत माहिती देऊन जनजागृतीची मोहीम व्यापक करावी. जिल्हा प्रशासनामार्फत लक्ष्मी मुक्ती योजना प्रभावीपणे राबवली, अस्वच्छ स्वच्छतागृह दाखवा आणि रु.१,००० मिळवा. हा उपक्रमही राबविल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

Advertisement
Tags :

.