स्टारलिंकची 2 महिन्यात भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा
डिव्हाइसची किंमत 33,000 रुपये : कंपनीला अनलिमिटेड डेटा प्लॅन राहणार
नवी दिल्ली :
एलॉन मस्क यांच्या मालकीची कंपनी स्पेसएक्स आपली स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस भारतात सुरू करणार आहे. यासाठी कंपनी लवकर काम सुरु करणार असून आता दूरसंचार विभागाचाही परवाना प्राप्त झाल्याने अन्य अडचणीही दूर झाल्या आहेत. माध्यमांच्या अहवालानुसार कंपनी भारतात पुढील दोन महिन्यांत आपली सेवा सुरू करणार आहे. सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिससाठी डिव्हाइसची किंमत कंपनीने जवळजवळ 33,000 रुपये निश्चित केली आहे. याशिवाय कंपनी महिना अनलिमिटेड डेटा प्लानसाठी 3,000 रुपये शुल्क आकारणार आहे. सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस भारतातील दुर्गम भागात मिळण्याची सोय होणार आहे. यामध्ये ट्रेडिशनल ब्रॉडबँड इंफ्रास्ट्रक्चर स्थापन करण्याचे आव्हान राहणार आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना सेवा सुरु झाल्यावर हायस्पीड इंटरनेट देणार असल्याचा दावाही कंपनीने यावेळी केला आहे.
मुख्य कंपनीच्या डिव्हाइसची किंमत ही भारताच्या शेजारी असणाऱ्या देशांमध्येही समान आहे. स्टारलिंक डिव्हाइसची किंमत बांग्लादेश आणि भूतान दोन्ही देशांमध्ये 33,000 रुपये इतकी आहे.