कृष्णविवरातून दोनवेळा सुखरुप बाहेर पडला तारा
ब्रह्मांडाचा हा चमत्कार ठरला लक्षवेधी
कृष्णविवर सर्वकाही गिळकृंत करत असते, परंतु वैज्ञानिकांनी एक असा तारा पाहिला आहे, जो एका सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलला दोनवेळा धडकूनही पूर्णपणे संपलेला नाही. हा अविश्वसनीय शोध इस्रायलच्या तेल अवीव युनिव्हर्सिटी आणि इंटरनॅशनल टीमच्या वैज्ञानिकांनी लावला आहे. संशोधन अलिकडेच द एस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्समध्ये प्रकाशित झाले आहे.
तेच ठिकाण, तसाच विस्फोट...
पहिल्यांदा 2020 मध्ये अंतराळाच्या एका हिस्स्यात एक तीव्र ब्राइट फ्लेयर पाहिला गेला. हा फ्लेयर एखादा तारा कृष्णविवराच्या अत्यंत नजीक पोहोचल्यावर आणि त्याचा मॅटर ब्लॅक होलमध्ये कोसळू लागल्यावर निर्माण होतो. वैज्ञानिकांनी याला ‘टायडल डिसरप्शन इव्हेंट’ म्हणजेच टीडीई संबोधिले आहे. परंतु याच्या दोन वर्षांनी 2022 मध्ये त्याच ठिकाणी तसाच फ्लेयर पुन्हा दिसला. याला एटी 2022डीबीएल नाव देण्यात आले. जेव्हा एखादा तारा कृष्णविवराच्या इतक्या समीप जातो, तेव्हा त्याचे पूर्ण अस्तित्व संपुष्टात येते, असे आतापर्यंत मानले जात होते. परंतु प्राध्यापक इअयर आर्कावी आणि त्यांच्या टीमने जे पाहिले, ते सर्वांना चकित करणारे होते. तारा पूर्णपणे नष्ट झाला नाही, तो पुन्हा परतल्याचे आर्कावी यांनी सांगितले.
कृष्णविवराला प्रदक्षिणा
हा तारा एका सुपरमॅसिव्ह ब्लॅक होलच्या चहुबाजूला फिरत आहे. याची कक्षा 700 दिवसांची आहे, प्रत्येक वेळी जेव्हा हा तारा ब्लॅक होलनजीक येतो, तेव्हा त्याचा काही हिस्सा खेचून ब्लॅक होलमध्ये जातो, परंतु आतापर्यंत हा पूर्णपणे नष्ट झालेला नाही. याचा अर्थ मागील 10 वर्षांपासून ज्या फ्लेयर्सला आम्ही पूर्ण तारा नष्ट झाल्याचा पुरावा मानत आलो आहोत, तो बहुधा चुकीचा होता. तारा केवळ आंशिक स्वरुपात नष्ट होत असावा, असे त्यांनी सांगितले.
ब्लॅक होलचे अनोखे जग
ब्लॅक होलमध्ये गुरुत्वाकर्षण इतके अधिक असते की, प्रकाशही तेथून निघू शकत नाही. हे सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल गॅलेक्सीच्या केंद्रस्थानी असतात. आमच्या मिल्की वे गॅलेक्सीदरम्यान देखील एक ब्लॅक होल असून तो सूर्यापेक्षा लाखो पट अधिक वजनी आहे. जेव्हा एखादा तारा त्यांच्यानजीक जातो, तेव्हा ब्लॅकहोलचे गुरुत्वाकर्षण त्याला नष्ट करते, तारा तुटतो आणि त्याचे अवशेष ब्लॅक होलच्या दिशेने पडू लागतात. याचदरम्यान एक जबरदस्त फ्लेयर तयार हाते. याच्याच माध्यमातून ब्लॅक होलचे अध्ययन केले जाते.

ब्लॅक होलविषयी नव्याने अध्ययन
आता या फ्लेयर्सची व्याख्या नव्याने करावी लागेल. तारा पूर्णपणे संपून जातो, असे मानत होतो. परंतु तारा पुन्हा परत येत असावा आणि ही समज आम्हाला ब्लॅक होलच्या स्वरुपाच्या आणखी जवळ नेणारी ठरेल असे आर्कावी यांनी म्हटले आहे.
पुढील फ्लेयर 2026 मध्ये
वैज्ञानिक आता 2026 ची प्रतीक्षा करत आहेत. तेव्हा तारा पुन्हा स्वत:च्या ऑर्बिटमध्ये ब्लॅकहोलनजीक जाणार आहे, त्यावेळी तो वाचेल का? किंवा यावेळी ब्लॅक होल त्याचे पूर्ण अस्तित्व संपवेल या प्रश्नाची उत्तरे तेव्हाच मिळू शकणार आहेत.