कॅन्सरविरोधी लढाईत स्टॅलिन सरकारची मोठी घोषणा
सर्व प्रौढ व्यक्तींची होणार तपासणी
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडू सरकार राज्यातील 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी कॅन्सर तपासणी अनिवार्य करणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री सुब्dरामण्यिन यांनी दिली आहे. राज्यातील एरोडू, तिरुपत्तूर, रानीपेट आणि नगरसोल जिल्ह्यांमध्ये कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. 2023 मध्ये तामिळनाडूत कॅन्सरचे सुमारे 82000 नवे रुग्ण समोर आले. सरकारने मागील वर्षी काही खास क्षेत्रांमध्ये कॅन्सर तपासणी अनिवार्य केली होती अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.
सर्वेक्षणानंतर सरकारने पूर्ण राज्यात 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व लोकांसाठी कॅन्सर निदान चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रारंभिक स्तरवर कॅन्सरचे निदान झाल्यास आजार गंभीर होण्यापासून रोखण्यास मदत मिळणार असल्याचे सुब्रमण्यिन यांनी सांगितले आहे.