For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फुटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर्स विजेता

10:10 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
फुटबॉल स्पर्धेत सेंट झेवियर्स विजेता
Advertisement

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व वनिता विद्यालय मराठी-कन्नड माध्यम स्कूल आयोजित कॅम्प विभागीय माध्यमिक मुलांच्या फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेंटझेवियर्सने सेंटमेरीज संघाचा टायब्रेकरमध्ये 5-3 असा पराभव करुन विजेतेपद पटकावून तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सेंट झेवियर्सने मराठी विद्यानिकतेन संघाचा 3-0 असा पराभव केला. झेवियर्सतर्फे इशान घाटगेने 2 तर माहीत भडकलीने 1 गोल केला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सेंटमेरीजने इस्लामीयाचा 1-0 असा निसटता पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला. मेरीजच्या ऋषभने एकमेव गोल केला. अंतिम सामन्यात झेवियर्सच्या इशान घाटगेने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्यासत्रात 32 व्या मिनीटात ऋषभने बरोबरीचा गोल करुन सामन्यात रंगत निर्माण केली. निर्धारीत वेळेत दोन्ही संघाचा गोल फलक समान राहिल्याने पंचांनी टायब्रेकरचा वापर केला. त्यामध्ये झेवियर्सने 5-3 अशा गोल फरकाने पराभव केला. झेवियर्सतर्फे अर्जुन सानिकोप्प, माहीद भडकली, इशान घाटगे, तेजसराज निंबन्नावर यांनी केले. तर मेरीजतर्फे ऋषभ व आकाश यांनी गोल केले. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. या संघाला फुटबॉल प्रशिक्षण मानस नायक यांचे मार्गदर्शन लाभले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कॅम्प विभागीय क्रीडा शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement
Tags :

.