महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘एसटी’ला विधानसभेत मिळणार आरक्षण

12:10 PM Feb 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गृहमंत्री अमित शहा यांचे मुख्यमंत्र्यांना आश्वासन

Advertisement

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवी दिल्लीच्या दौऱ्यात काल रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि गोव्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली. ‘एसटी’ समाजासाठी विधानसभा मतदारसंघ राखीव ठेवावेत ही मागणी डॉ. सावंत यांनी त्यांच्या कानावर घातली आणि ती मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी, असे त्यांना सांगितले. या मागणीवर आपण लवकरात लवकरच विचार कऊन तोडगा काढतो आणि एसटी समाजासाठी राजकीय आरक्षण देतो, असे आश्वासन शहा यांनी सावंत यांना दिले आहे. या भेटीमध्ये एसटी समाजाचे शिष्टमंडळ नव्हते. ही भेट अचानक ठरल्यामुळे एसटी शिष्टमंडळांची अमित शहा यांच्याशी भेट होऊ शकली नाही. पुढच्या भेटीत एसटी समाजाचे शिष्टमंडळ शहा यांच्याकडे नेण्यात येईल, अशी माहिती डॉ. सावंत यांनी दिली. या भेटीमुळे एसटी समाजाची मागणी केंद्र सरकारपर्यंत पोहोचली असून या समाजाला 2027 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय आरक्षण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article