For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेंट पॉल्स, झेवियर्स, संत मीरा, हेरवाडकर उपांत्यफेरीत

11:09 AM Oct 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
सेंट पॉल्स  झेवियर्स  संत मीरा  हेरवाडकर उपांत्यफेरीत
Advertisement

सेंट जोसेफ संतिबस्तवाड अ, ब, सेंट जोसेफ, झेवियर्स उपांत्यफेरीत

Advertisement

बेळगाव : पोलाईट वर्ल्ड वाईड संघटना व सेंट पॉल्स स्कूल आयोजित 57 व्या फादर एडी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातून सेंट पॉल्स, सेंट झेवियर्स, संत मीरा व हेरवाडकर तर निशा छाब्रिया चषक स्पर्धेत सेंट जोसेफ संतिबस्तवाड अ व ब, सेंट जोसेफ बेळगाव, सेंट झेवियर्स संघाने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. सेंट पॉल्स पदवीपूर्व महाविद्यालयाच्या मैदानावरती पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सेंट झेवियर्सने ज्ञान प्रबोधन संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे गोलफलक कोराच राहिला.

32 व्या मिनिटाला ज्ञान प्रबोधनच्या बचाव फळीतील खेळाडूला हाताला चेंडू लागल्याने पंचांनी पेनॉल्टी बहाल केली. त्याचा फायदा झेवियर्सच्या इव्हान खानने गोलात रुपांतर करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 35 व्या मिनिटाला महमद बी. च्या पासवर माहिदने गोल करून 2-0 ची आघाडी झेवियर्सला मिळवून दिली. दुसऱ्या सामन्यात संत मीराने केएलएसचा 4-0 असा पराभव केला. 18 व 22 व्या मिनिटाला संत मीराच्या जीवदानच्या पासवर गौरवने सलग गोल करून 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 32 व्या मिनिटाला वेदानच्या पासवर जीवदानने तिसरा गोल केला. तर 48 व्या मिनिटाला गौरवच्या पासवर अनिरुद्धने चौथा गोल करून 4-0 ची आघाडी मिळवून दिली.

Advertisement

तिसऱ्या सामन्यात एम. व्ही.हेरवाडकरने ज्योती सेंट्रलचा 3-1 असा पराभव केला. तिसऱ्या मिनिटाला हेरवाडकरच्या प्रणीतच्या पासवर रितेशने गोल करून 1-0 ची आघाडी मिळविली. 25 व्या मिनिटाला ज्योती सेंट्रलच्या स्वप्नीलने बचावफळीला चकवत गोल करून 1-1 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. 33 व्या मिनिटाला हेरवाडकरच्या अथर्व नाकाडीच्या पासवर रितेशने दुसरा गोल केला तर 59 व्या मिनिटाला रितेशच्या पासवर प्रणीतने तिसरा गोल करून 3-1 अशी आघाडी मिळवून दिली.

चौथ्या सामन्यात सेंट पॉल्सने एमव्हीएमचा 2-0 असा पराभव केला. सामन्याच्या 6 व्या मिनिटाला सेंट पॉल्सच्या श्रेयश तरळेच्या पासवर श्वान जोसेफने  पहिला गोल करून 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 36 व 37 व्या मिनिटाला रक्षितच्या पासवर आराध्य नाकाडीने गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. निशा छाब्रिया मुलींच्या चषक फुटबॉल स्पर्धेत पहिल्या उपांत्यफेरीच्या स्पर्धेत सेंट जोसेफ संतिबस्तवाड संघाने संत मीरा संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात 8 व 27 व्या मिनिटाला संतिबस्तवाडच्या तनुश्रीच्या पासवर स्नेहाने सलग दोन गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. सेंट झेवियर्स संघाने डीपी संघाचा 4-0 असा पराभव केला.

उपांत्यफेरीचे उद्याचे सामने

  • सेंट झेवियर्स विरुद्ध हेरवाडकर यांच्यात दुपारी 2.30 वा.
  • सेंट पॉल्स विरुद्ध संत मीरा यांच्यात सायंकाळी 4 वा.

मुलींच्या गटात

  • सेंट जोसेफ कॉन्व्हेंट विरुद्ध सेंट जोसेफ संतिबस्तवाड अ यांच्यात 3 वा.
  • सेंट झेवियर्स विरुद्ध सेंट जोसेफ ब संतिबस्तवाड 4.30 वा.
Advertisement
Tags :

.