For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप! सांगलीत एसटी वाहतूक ठप्प! प्रवाशांचे हाल

12:56 PM Sep 04, 2024 IST | Abhijeet Khandekar
एसटी कर्मचाऱ्यांचा संप  सांगलीत एसटी वाहतूक ठप्प  प्रवाशांचे हाल
ST employees strike!
Advertisement

700 कर्मचारी संपावर : 725 फेऱ्या रद्द : 27 लाखांचे नुकसान

सांगली प्रतिनिधी

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. याचे पडसाद सांगलीतही उमटले. सांगली एसटी विभागातील 700 कर्मचाऱ्यांनी काम बंद करत येथील एसटी विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यामुळे प्रवाशांचे विशेषत: विद्यार्थ्यांचे हाल झाले. एसटीलाही फटका बसला. 725 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. परिणामी 26 लाख 88 हजार 168 ऊपयांच्या उत्पन्नावर एसटीला पाणी सोडावे लागले. दरम्यान कर्मचाऱ्यांचा संप सुऊच आहे.

Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलां†बत आर्थिक मागण्यांवर ा†द. 11 सप्टेंबर 2023 रोजी शासन पातळीवर झालेल्या बैठकीत महागाई भत्ता व वार्षिक वेतनवाढीच्या वाढीव दराच्या थकबाकीबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांच्यासह संघटनेच्या प्रा†ता†नधींसमवेत 15 ा†दवसात बैठक घेऊन ा†नर्णय घेण्याचे मान्य केले होते. परंतु असा ा†नर्णय होऊन 9 मा†हन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला. मात्र, बैठक झालेली नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे राज्यभरातील लालपरी ठप्प झाली आहे.

सांगलीतही आंदोलनाचे पडसाद उमटले. सांगली एसटी आगाराकडे 3 हजार 618 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी 699 कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले होते. तर 2 हजार 919 कर्मचारी कार्यरत होते. मोठ्या संख्येने कर्मचारी संपामध्ये सहभागी झाल्याने एसटी वाहतूकीवर याचा मोठा परिणाम झाला. एसटीला 725 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. प्रवाशांचे विशेषत: विद्यार्थ्यांचे हाल झाले. लांबपल्ल्याच्या गाड्या आगारातच थांबून होत्या. जिल्हांतर्गत वाहतूक काही प्रमाणात सुऊ होती. त्यामुळे काही अंशी प्रवाशांना दिलासा मिळाला. आंदोलनकर्ते कर्मचाऱ्यांनी सांगलीत एसटी विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. महाराष्ट्र एसटी कामगार संयु‹ कृती सा†मतीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

Advertisement

एसटीच्या सांगली विभागातील मिरज, जत आणि पलूस आगारातील वाहतूक पूर्णपणे बंद होती. तर इस्लामपूर, शिराळा, तासगाव, कवठेमहांकाळ, विटा व सागली आगारातून काहीअंशी वाहतूक सुऊ होती. तर आटपाडी आगारातील एसटी वाहतूक मात्र सुऊ होती. राज्य सरकारी कर्मच्रायांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे, महागाई भत्त्याची थकबाकी देण्यात यावी, वार्षिक वेतनवाढीच्या व घरभाडे भत्त्याच्या वाढीव दराची थकबाकी दण्यात यावी. एसटी कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या वैद्यकीय खर्चाच्या प्रा†तपूर्तीच्या योजनेऐवजी पॅशलेस योजना लागू करावी. सुधा†रत ा†शस्त व आ†पल कार्यपध्दतीमध्ये ा†शक्षेचे प्रमाण जास्त असल्यामुळे याबाबत कामगारांमध्ये असंतोष आहे. म्हणून सुधा†रत ा†शस्त व आ†पल कार्यपध्दती रद्द करावी. एसटी कर्मच्रायांना व त्यांच्या कुटां†बयांना सर्व प्रकारच्या एसटी बसेसमध्ये मोफत पासाची सवलत फरक न भरता लागू करावी.

सेवा†नवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना 6 मा†हन्याऐवजी 1 वर्षाचा मोफत पास सर्व प्रकारच्या एसटी बसेसमध्ये उपलब्ध कऊन देण्यात यावा आदी मागण्यांसाठी आंदोलन सुऊ आहे. यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे ा†वभागीय अध्यक्ष, ा†वभागीय सा†चव यांच्यासह एसटी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मुंबईतील बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप सुऊच ठेवला आहे.

दिवसभरात 27 लाखांचे नुकसान
सांगली आगारातील 700 वर कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले होते. यामुळे एसटीला 725 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. परिणामी सांगली आगाराला दिवसभरामध्ये जवळपास 26 लाख 88 हजार 188 ऊपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले. दरम्यान एसटीच्या सांगली विभागातील मिरज, जत आणि पलूस आगारातील वाहतूक पूर्णपणे बंद होती. तर इस्लामपूर, शिराळा, तासगाव, कवठेमहांकाळ, विटा व सागली आगारातून काही अंशी वाहतूक सुरू होती.
सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, सांगली आगार.

Advertisement
Tags :

.