कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने एस टी पलटल्याने अपघात

01:02 PM Dec 31, 2024 IST | Pooja Marathe
ST bus overturns after driver loses control
Advertisement

९ प्रवासी गंभीर जखमी
सोलापूर

Advertisement

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा एसटी आगार येथे अपघात झाला. करमाळा-कर्जत रस्त्यावर रायगाव (ता. करमाळा) जवळ एका वळणावर एस.टी ड्रायव्हरचा स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात ९ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, तर इतर प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

Advertisement

करमाळा-कर्जत ही बस करमाळ्याकडे येत असताना रायगावजवळ एस बस पलटी झाली. . या बसमधून साधारणपणे ३० जण प्रवास करत होते. यापैकी ९ जण गंभीर जखमी झाले आङेत. जखमींमध्ये एका प्रवाशाचा हात तुटला आहे तर एक आठ वर्षाच्या मुलाच्या पाठीला जोरदरा मार लागल्याचीही माहिती पुढे येत आहे. या बसमधून काही विद्यार्थीही प्रवास करत होते, पण सुदैवाने त्यांना काही झालेले नाही. त्यांनी सुखरूप सुटका करण्यात आली.

या अपघातात अडकलेल्या प्रवाश्यांना बसची पुढील काच फोडून आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी बचावकार्य सुरू असताना परिसरतील लोकांनीही सहकार्य केले. घटनेतील जखमींना ताबडतोब उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. स्टेअरींगचा रॉड तुटल्याने हा अपघात घडल्याचे जरी प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे असले, तरी हा अपघाताचे नेमके कारण अद्याप पुढे आलेले नाही.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article