कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दहावी परीक्षेचा आज निकाल

07:00 AM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सकाळी 11:30 वाजता वेबसाईटवर उपलब्ध

Advertisement

बेंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ (केएसईएबी) शुक्रवारी 2 मे रोजी 2024-25 या शैक्षणिक वर्षातील दहावी वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. शिक्षण खात्याच्या अधिकृत वेबसाईटवर सकाळी 11:30 वाजता निकाल उपलब्ध केला जाणार आहे. तत्पूर्वी शालेय शिक्षण मंत्री मधू बंगारप्पा बेंगळूरमधील केएसईएबीच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत परीक्षेचा निकाल जाहीर करतील. 21 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत राज्यातील 2,818 केंद्रांवर दहावी परीक्षा-1 पार पडली होती. सुमारे 8.96 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यामध्ये 4,61,563 मुलांचा तर 4,34,884 मुलींचा समावेश होता. गतवर्षी मेच्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्या तुलनेत यंदा जलदगतीने उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन पूर्ण करून एक आठवडा आधीच निकाल जाहीर केला जात आहे. दहावी परीक्षा-1 चा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना http://karresults.nic.in या वेबसाईटला भेट देता येईल. तेथे परीक्षेचा नोंदणी क्रमांक व जन्म तारीख नमूद करून निकालपत्रक डाऊनलोड करून घेता येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article