For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सृष्टी किरणचे पहिले जेतेपद

06:33 AM Oct 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
सृष्टी किरणचे पहिले जेतेपद
Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

Advertisement

कर्नाटकाची 13 वर्षीय महिला टेनिसपटू सृष्टी किरणने आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातील कनिष्ठ विभागात पहिले विजेतेपद मिळविले आहे. डॉम्निकन प्रजासत्ताक येथे आयोजिलेल्या आयटीएफ जे-30 टेनिस स्पर्धेत सृष्टी किरणने एकेरीचे जेतेपद पटकाविले.

या स्पर्धेतील झालेल्या अंतिम सामन्यात सृष्टी किरणने व्हेनेझुएलाच्या स्टिफेनी पुमारचा 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत जेतेपद हस्तगत केले. सृष्टी किरणने या स्पर्धेत रशियाच्या द्वितीय मानांकित अॅरिना व्हॅनसोविचला पराभवाचा धक्का देत आपली वाटचाल केली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.