एसआरएस हिंदुस्तान,पांडुरंग सीसी उपांत्यपूर्व फेरीत
साईराज चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : साईराज स्पोर्टस क्लब आयोजित दहाव्या साईराज चषक निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या विविध सामन्यातून पांडुरंग सीसी संघाने ब्रदर्सचा, एसआरएस हिंदुस्तानने एवायसी अझमनगरचा, पांडुरंग सीसीने साईराज वॉरियर्सचा, एसआरएस हिंदुस्तानने डेपो मास्टर्सचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. गौस शेख, रवी गुप्ता, मुक्रम हुसेन, जतीन ठाकुर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात पांडुरंग सीसीने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 1 गडी बाद 158 धावा केल्या. गौस शेखने 11 उत्तुंग षटकार व 4 चौकारांसह 24 चेंडूत नाबाद 86, सौरभने 7 षटकार व 3 चौकारांसह 23 चेंडूत 64 धावा केल्या. त्यानंतर ब्रदर्सने 8 षटकात 3 गडी बाद 41 धावा केल्या. पांडुरंग सीसीतर्फे मुक्रमने 2, सिद्धाप्पाने 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात एवायसी अझमनगरने प्रथम फलंदजी करताना 8 षटकात 8 गडी बाद 48 धावा केल्या.
त्यानंतर पांडुरंग सीसीने 4.3 षटकात 1 गडी बाद 68 धावा करून सामना 9 गड्यांनी जिंकला. अबुभाकरने 3 षटकार 1 चौकारासह 30, सौरभने 3 षटकार 1 चौकारासह 25 तर आकाशने 11 धावा केल्या. चौथ्या सामन्यात डेमो मास्टर्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 64 धावा केल्या. शाहूने 2 षटकार 1 चौकारांसह 19, स्वयंम अप्पण्णवरने 1 षटकार 2 चौकारांसह 18 तर पार्थ पाटीलने 12 धावा केल्या. एसआरएसतर्फे जतीनने 13 धावात 3, अमय व सुशील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर एसआरएस 5.1 षटकात 3 गडी बाद 67 धावा करुन सामना 7 गड्यांनी जिंकला. रोहीतने 14, रवीने व संग्रामने यांनी प्रत्येकी 13 धावा केल्या. डेपो मास्टर्सतर्फे करीम व मोहसीन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
आजपासून समालोचक चंद्रकांत शेट
उपांत्यफेरीच्या सामन्यादरम्यान महाराष्ट्रात आपल्या समालोचनावर छाप सोडणारा समालोचक चंद्रकांत शेट हे आजपासून सुरु होणाऱ्या उपांत्यपूर्व, उपांत्य व अंतिम सामन्यासाठी समालोचन करणार आहेत. यापूर्वीही त्यांनी साईराज चषक स्पर्धेत आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीत समालोचन केले होते. त्यांचे समालोचन पुन्हा एकदा बेळगावकरांना ऐकावयास मिळणार आहे.
आजचे उपांत्यफेरीचे सामने
- मोहन मोरे स्पोर्ट्स वि. निल इंडियन बॉईज हिंडलगा सकाळी 9 वा.
- मराठा स्पोर्ट्स वि. गो गो स्पोर्ट्स दुपारी 11 वा.
- प्रथमेश मोरे वि. पांडुरंग सीसी यांच्यात दुपारी 1 वा.