बेळगावात १२ जानेवारी रोजी होणार श्रीस्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन
अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने दरवर्षी पालखीचा पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात येतो. यंदाचे हे २७ वे वर्ष आहे. शुक्रवार दि. १२ रोजी हि पालखी कोवाडहुन बेळगावात दाखल होईल. सायंकाळी ४.०० वाजता हट्टीहोळी गल्ली शहापूर येथे पालखीचे आगमन झाल्यानंतर पालखीची मिरवणूक काढण्यात येईल. व तिथेच रात्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच त्याठिकाणीच पालखीचा मुक्काम करण्यात येईल.
तसेच बेळगाव मधील विविध ठिकाणी हि पालखी जाणार आहे. त्यामध्ये १३ जानेवारी रोजी सकाळी १०.०० वाजता श्री गाडगेबाबा भवन येथे आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच बरोबर सायंकाळी ४.०० वाजता पालखीचे आगमन श्री स्वामी समर्थ आराधना केंद्र महाद्वार रोड येथे होईल तिथेच पालखीचा मुक्काम राहील. १४ जानेवारी रोजी पहाटे अभिषेक झाल्यानंतर हनुमान नगर येथील आझाद सोसायटी येथे जाईल व त्यादिवशीचा मुक्काम प्रमोद बर्डे यांच्या घरी जाईल. १५ जानेवारी सकाळी पालखी गोकाक कडे रवाना होईल. व त्याच दिवशी परत गणेशपूर बेळगाव येथे येईल आणि विकास बर्डे यांच्या घरी मुक्कामाला राहील. १६ जानेवारी सकाळी ११. ०० वाजता हि पालखी दीपक खोबरे यांच्या घरी जाईल व पिरनवाडी येथे मुक्कामाला थांबेल. तर १७ जानेवारी रोजी कडोलकर गल्ली येथील राजेंद्र गायकवाड यांच्या घरी पालखीचा मुक्काम असेल.