महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीरामचरणी आतापर्यंत सुमारे 5,500 कोटी जमा

06:13 AM Jan 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

देश-विदेशातून देणग्यांचा ओघ सुरूच : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा आठवड्यावर

Advertisement

वृत्तसंस्था/ अयोध्या

Advertisement

अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. भव्य राम मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारीला होणार असून त्याच दिवशी रामलल्ला गर्भगृहात विराजमान होणार आहेत. रामभक्तांच्या देणगीतून अयोध्येत भगवान रामाच्या भव्य मंदिराचे बांधकाम सुरू असून पहिला मजला पूर्णपणे सज्ज झाला आहे. येथेच रामलल्लाची मूर्ती बसवण्यात येणार आहे. आतापर्यंत श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला राम मंदिरासाठी 5 हजार 500 कोटी रुपयांहून अधिक देणग्या मिळाल्या आहेत. अजूनही देणगीदारांचा ओघ सुरू असून दिवसेंदिवस देणग्यांचा आकडा वाढतच चालला आहे.

राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी देणाऱ्यांच्या यादीत मोरारी बापूंचे नाव अग्रस्थानी आहे. गुजरातमधील मोरारी बापूंनी राम मंदिरासाठी आजवरची सर्वाधिक देणगी दिली आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, मोरारी बापूंनी राम मंदिरासाठी 11.3 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. याशिवाय अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमधील त्यांच्या अनुयायांनीही स्वतंत्रपणे 8 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. मोरारी बापू यांचा जन्म गुजरातमधील भावनगरमध्ये झाला असून आजही ते आपल्या कुटुंबासह तेथेच राहतात.

अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी देणगी देणाऱ्यांमध्ये मोरारी बापूंनंतर सर्वाधिक देणगी देणारा गुजरातमधील एक व्यावसायिक आहे. सुरतमधील गोविंदभाई ढोलकिया या हिरे व्यापाऱ्याने राम मंदिराच्या उभारणीसाठी 11 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. निधी संकलन मोहिमेचा एक भाग म्हणून त्यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी 11 कोटी रुपयांचा धनादेश ट्रस्टकडे सुपूर्द केला होता. गोविंदभाई ढोलकिया हे हिरे कंपनी श्रीरामकृष्ण एक्स्पोर्ट्सचे मालक आहेत. गोविंदभाई दरवषी दिवाळीत चर्चेत राहतात. दिवाळीमध्ये ते आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठ्या आणि महागड्या भेटवस्तू देतात.

राम मंदिर ट्रस्टने देशातील 11 कोटी लोकांकडून 900 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले होते. मात्र आत्तापर्यंत प्रभू राम मंदिरासाठी 5,500 कोटी ऊपयांपेक्षा जास्त देणग्या मिळाल्या आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत सुमारे 18 कोटी रामभक्तांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी नॅशनल बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्या खात्यांमध्ये सुमारे 3,200 कोटी रुपयांचा समर्पण निधी जमा केला आहे. ट्रस्टने या बँक खात्यांमध्ये दान केलेल्या पैशाची एफडी केली होती. या देणग्यांमधून मिळालेल्या व्याजाच्या पैशातून राम मंदिराचे सध्याचे स्वरूप म्हणजेच पहिला मजला बांधण्यात आला आहे.

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद पहिले देणगीदार

अयोध्या राम मंदिराच्या उभारणीसाठी निधी गोळा करण्याचा उपक्रम माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 14 जानेवारी 2021 रोजी सुरू केला. माजी राष्ट्रपती राम मंदिरासाठी पहिले देणगीदार बनले. त्यांनी श्री रामजन्मभूमी ट्रस्टसाठी 5 लाख ऊपयांचे योगदान धनादेशाद्वारे प्रदान केले होते. त्यापासून आतापर्यंत मंदिराच्या उभारणीसाठी जगभरातील भाविक योगदान देत आहेत. गेल्या तीन वर्षांत मंदिर ट्रस्टला मिळालेल्या देणग्या जवळपास 5,500 कोटी ऊपयांवर पोहोचल्या आहेत. प्राप्त झालेला निधी ट्रस्टच्या नियुक्त बँक खात्यांमध्ये जमा केला जातो. याव्यतिरिक्त, दररोज 2 लाख ऊपयांपर्यंतच्या देणग्या ऑनलाईन व्यवहार, धनादेश आणि रोख अशा विविध माध्यमांद्वारे प्राप्त होत आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article