For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीrमद् भगवद्गीता : वर्तमान कर्म हाच आपला धर्म

11:01 AM Dec 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
श्रीrमद् भगवद्गीता   वर्तमान कर्म हाच आपला धर्म
Advertisement

कुठलंही कार्य धर्माला म्हणजे नीतिमत्तेला अनुसरूनच केलं पाहिजे

Advertisement

धर्मक्षेत्रे कुरूक्षेत्रे...... या राजा धृतराष्ट्र यांच्या श्लोकाने श्रीमद् भगवद्गीतेची सुऊवात होते. प्रŽ हा पडतो की या युद्धभूमीला, धर्मक्षेत्र असे का म्हटले असेल? तर या भूमीत देवादिकांनी यज्ञ केले होते, इथे राजा कुरूंनी पण तपश्चर्या केली होती. यज्ञ, धर्मकार्य, कुरूराजाने केलेली तपश्चर्या यामुळे याला धर्मभूमी कुरूक्षेत्र म्हटलं जातं. यामध्ये असं म्हटलं जातं की कुठलंही कार्य हे धर्माला म्हणजे नीतिमत्तेला अनुसरूनच केलं पाहिजे.

धृतराष्ट्रांच्या क्षेत्र असे संबोधण्यामागे कुरूंची जागा असा अर्थ होता. खरे तर ही भूमी ही संपूर्ण कुरूंची होती. ज्यामध्ये पांडवही आले. परंतु, राजा धृतराष्ट्रांनी, राजा पंडूच्या पुत्रांना पांडव असे म्हटले. म्हणजे ते वेगळे आहेत, असे दाखवून दिले. याचा अर्थ असा की कुऊक्षेत्रांची भूमी ही पांडवांची नाही. परंतु पांडवांना आपलाच हक्क मिळविण्यासाठी हे युद्ध माता कुंतीच्या आज्ञेने करावे लागले. कुंती या खरोखरच सहिष्णू अशा राणी होत्या. राजदरबार, सुख या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनात कुठेही नव्हत्या. भगवान श्रीकृष्णांकडे तर त्यांनी नेहमीच संकट दे, असं सांगितलं होतं. कारण संकटामध्येच श्रीकृष्णा, तुझी आठवण होईल असं त्यांचं म्हणणं होतं. असे सर्व असताना त्यांनी या युद्धाला कशी बरे परवानगी दिली हा प्रŽ उभा राहतो?

Advertisement

युद्ध पांडव आणि कौरव यांच्यामध्ये होते. तरी त्यामध्ये जे द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचे जे अघोरी कृत्य झाले, ते खूप लाजिरवाणे आणि दु:खदायक होते. जे की माता कुंतीना बिलकुल सहन झाले नाही. दुसरे कारण असे की भगवान श्रीकृष्ण जेव्हा कौरवांकडे संधी प्रस्ताव घेऊन गेले, तेव्हा दुर्योधन, शकुनी, कर्ण आदी लोकांनी त्यांना बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला. हेही कुंतीसाठी त्रासदायक होते. राजा धृतराष्ट्रांनी पांडवांना कुरूंपेक्षा वेगळे संबोधिले. म्हणजे कौरव हे कुरू आहेत व पांडव हे वेगळे आहेत असा त्यांचा अर्थ होता. यानेही कुंतीच्या भावना खूपच दुखावल्या गेल्या. तसेच जेव्हा पांडवांनी जमिनीमध्ये आपला हक्क सांगितला. तेव्हा दुर्योधन म्हणाला सुईच्या अग्राइतकीही जमीन तुम्हाला मिळणार नाही, यासाठी तुम्हाला युद्ध हे करावेच लागेल. तेव्हा कुंतींनीही हा निर्णय घेतला की, जर अशी दुष्ट माणसं जगात राहिली तर ही समाजासाठी अनिष्टकारक ठरतील म्हणून यांचा नाश होणे हे समाज हिताच्या दृष्टीने गरजेचे आहे.

जेव्हा अधिकाराशिवाय गोष्टीची इच्छा होते तेव्हा महाभारतासारख्या युद्धाला सुऊवात होते. वस्त्रहरणाने दु:खीत, क्रोधित द्रौपदीने सुद्धा प्रतीज्ञा केली होती की, जर पांडवांनी हे युद्ध नाही केले, तरी ती, तिचे पिता व तिचे बंधू तसेच तिचे सर्व पुत्र व अभिमन्यू यांच्या करवी हे युद्ध करून दुर्योधन व त्याच्या साथीदारांचा नाश करवेल. अशा एक ना अनेक कारणाने या महाभारताचे युद्ध टाळणे असंभव होते. इथे जनसामान्यांसाठी खूप महत्त्वाचा संदेश आहे की, जेव्हा अधिकाराशिवाय गोष्टी घेण्याची इच्छा होते तेव्हा महाभारतासारख्या युद्धाला सुऊवात होते.

श्रीकृष्णांच्या प्रत्येक कार्यामागे काही ना काही जनकल्याणाची योजना

पुढे असा प्रŽ पडतो की, श्रीमद् भगवद्गीतेसारखा पवित्र ग्रंथ भगवान श्रीकृष्णांनी कुरूक्षेत्रातल्या युद्धात का बरं सांगितला असेल? जेव्हा दोन्हीकडील सैन्य युद्धासाठी सज्ज होते तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद् भगवद्गीता सांगण्याचा निर्णय घेतला. भगवान श्रीकृष्णांच्या प्रत्येक कार्यामागे काही ना काही जनकल्याणाची योजना असते हे आपल्याला पुढे निदर्शनास येईल.

आपल्या कर्मापासून विमुख होऊ नये

जेव्हा धनुर्धर अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाले, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चला तेव्हा, श्रीकृष्ण जे की सारथी होते, त्यांनी अर्जुनांचा रथ हा खूप चतुराईने, भीष्म पितामह व गुरू द्रोणाचार्य तसेच जिथून कुरूंचे मोठे मोठे राजा दिसतील यांच्यासमोर नेऊन उभा केला. या सगळ्यांना युद्धात समोर प्रतिस्पर्धी पाहून अर्जुन हे भावविवश झाले. कारण पांडव आणि कौरव हे जरी दोन विभागले असले तरी मूळत: हे दोन्हीही कुरवंशीयच होते. इथे अर्जुनामध्ये आपल्या कुटुंबीयांसाठी मोह निर्माण होतो आणि श्रीकृष्णांना अर्जुनाद्वारे संपूर्ण जगताला हाच संदेश द्यायचा आहे की, कितीही मोहाचे क्षण आले तरी आपले कर्म करण्या पासून विमुख होऊ नये, आणि याच कारणासाठी भगवान श्रीकृष्णांनी कुऊक्षेत्रातल्या युद्धासमई श्रीमद् भगवद्गीतेचे ज्ञान अर्जुनाद्वारे संपूर्ण जगताला दिले.

- प्रीती प्रशांत चिंडक, शहापूर-बेळगाव

भविष्यातल्या हिताकडे लक्ष देणे महत्त्वाचे

वरवर पाहता सर्वांना असे वाटते की, श्रीकृष्णाने गीतेचे ज्ञान हे अर्जुनाला युद्ध करायला, प्रवृत्त करण्यासाठी दिले, परंतु जर मूळत: पाहिले, तर हे युद्ध करण्याची अर्जुन म्हणजेच संपूर्ण पांडव बांधवांची इच्छा होती आणि म्हणूनच त्यांनी श्रीकृष्णाला बोलाविले होते. पण जेव्हा श्रीकृष्णांनी त्यांचा मोहनाश करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांसमोरच त्यांना उभे केले, तेव्हा मात्र अर्जुन कुटुंब मोहाने हतबल झाला व आपल्या निर्णयापासून ढळू लागला. परंतु एक कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून अर्जुन जरी आता हा निर्णय भावनात्मक दृष्टीने घेत असला तरी भविष्यात त्याला एक योद्धा म्हणून या निर्णयाचा नक्कीच पश्चाताप होईल, हे भगवान श्रीकृष्णांना माहिती होते आणि संपूर्ण जगतालाही हा संदेश होता की वर्तमान समयातल्या अडचणी किंवा मोह किंवा राग या सगळ्या गोष्टींना बळी न पडता आपले वर्तमान समयातील कर्तव्य व भविष्यातली नीती, पूर्ण हीत याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे व त्यानुसार कार्य करणे गरजेचे आहे. संपूर्ण श्रीमद्भगवद्गीता ही आपले कर्म हेच आपला धर्म आहे हेच शिकविते. श्रीमद्भगवद्गीते अनुसार धर्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून आपले वर्तमान समयातील कर्तव्य, कर्म म्हणजेच आपला धर्म आहे.

Advertisement
Tags :

.