कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अनुराग बसूच्या चित्रपटात श्रीलीला

06:40 AM Mar 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कार्तिक आर्यनसोबत झळकणर

Advertisement

श्रीलीलाने अनेक चित्रपटांद्वारे स्वत:ची खास ओळख निर्माण केली आहे. श्रीलीला आता कार्तिक आर्यनसोबत रोमँटिक चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. या चित्रपटासाठी प्रारंभी तृप्ति डिमरीची निवड करण्यात आली होती. परंतु काही कारणांमुळे ती या चित्रपटातून बाहेर पडली आहे. या चित्रपटासाठी आता श्रीलीलाची निवड करण्यात आली आहे.  दिग्दर्शक अनुराग बसू यांनी यासंबंधी निर्णय घेतला आहे. श्रीलीला या चित्रपटात कार्तिक आर्यनची नायिका म्हणून काम करणार आहे. श्रीलीला स्वत:च्या कारकीर्दीत नव्या रोमँटिक रोमांचसोबत बॉलिवूडमध्ये सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहे.

Advertisement

श्रीलीला ही बॉलिवूडमध्ये तुलनेत नवखी आहे. अल्लू अर्जुनचा चित्रपट पुष्पा 2 मध्ये एका गाण्यात नृत्य करत तिने पूर्ण देशात लोकप्रियता मिळविली आहे. याचबरोबर श्रीलीला मॅडॉक फिल्म्सकडून निर्मित एका चित्रपटात इब्राहिम अली खानसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article