श्रीकांतचे आव्हान उपांत्य फेरीत समाप्त
06:51 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ बेसिल (स्वीस)
Advertisement
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या स्वीस खुल्या सुपर 300 दर्जाच्या पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदाम्बी श्रीकांत आव्हान पुरुष एकेरीत उपांत्य फेरीत समाप्त झाले. चीन तैपेईच्या लीन चून यी याने श्रीकांतचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.
पुरुष एकेरीच्या जवळपास 70 मिनिटे चाललेल्या चुरशीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात चीन तैपेईच्या माजी टॉप सिडेड लीन चून यीने किदाम्बी श्रीकांतचा 15-21, 21-9, 21-18 अशा गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. किदाम्बीच्या या पराभवामुळे स्वीस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. 210000 अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत श्रीकांतने तब्बल 16 महिन्यानंतर पहिल्यांदा उपांत्य फेरी गाठली होती.
Advertisement
Advertisement