कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीकांत, उन्नती, आयुष शेट्टी दुसऱ्या फेरीत

06:16 AM May 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ तैपेई

Advertisement

स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत, आयुष मन्नेपल्ली व उन्नती हुडा यांनी तैपेई ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेची विजयी सुरुवात करीत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले.

Advertisement

जागतिक क्रमवारीत 61 व्या स्थानावर असणाऱ्या श्रीकांतने आपल्याच देशाच्या एस. सुब्रमण्यमचा 21-16, 21-15 असा पराभव केला. सुब्रमण्यम हा 2022 चा वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपचा रौप्यविजेता आहे. 32 वर्षीय श्रीकांतची लढत आणखी एक भारतीय आयुष शेट्टीविरुद्ध होईल. आयुषने शानदार प्रदर्शन करीत तिसऱ्या मानांकित व जागतिक 13 व्या मानांकित चिनी तैपेईच्या ली चिया हाओला 21-17, 21-18 असा 50 मिनिटांच्या खेळात पराभवाचा धक्का दिला. चिया हाओ हा मार्चमध्ये झालेल्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपचा उपविजेता आहे.

2023 चा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा सुवर्णविजेता तरुण मन्नेपल्लीने जिगरबाज खेळ करीत जपानच्या शोगो ओगावाचा 21-17, 19-21, 21-12 असा पराभव केला. 70 मिनिटे ही लढत रंगली होती. त्याची पुढील लढत इंडोनेशियाच्या मोहम्मद झाकी उबेदिल्लाहशी होईल. मीराबा लुवांग मैस्नमला कॅनडाच्या ब्रायन यांगकडून 21-23, 12-21 असा पराभव स्वीकारावा लागला.

महिला एकेरीत भारताच्या उन्नती हुडाने आपल्याच देशाच्या अनुपमा उपाध्यायवर 21-13, 21-17 अशी मात केली. तिची पुढील लढत तैपेईच्या लिन सिह युनशी होईल. आकर्षी कश्यपला मात्र तैपेईच्या हंग यि टिंगकडून 9-21, 12-21 अशी एकतर्फी हार पत्करावी लागली

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article