महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

श्रीकांत, राजावत, जॉर्ज, त्रीसा-गायत्री उपांत्यपूर्व फेरीत

06:03 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ बॅसेल, स्वित्झर्लंड

Advertisement

भारताचे पीव्ही सिंधू व लक्ष्य सेन यांचे येथे सुरू असलेल्या स्विस ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले तर किदाम्बी श्रीकांत, प्रियांशू राजावत, किरण जॉर्ज व त्रीसा-गायत्री यांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.

Advertisement

किदाम्बी श्रीकांतने मलेशियाच्या अग्रमानांकित ली झी जियाला 21-16, 21-15 असा पराभवाचा धक्का देत शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविले. राजावतने चीनच्या लेई ला झि याच्यावर 21-14, 21-13 अशी मात केली तर किरण जॉर्जने फ्रान्सच्या अॅलेक्स लॅनियरवर 18-21, 22-20, 21-18 अशी संघर्षपूर्ण लढतीत मात केली. श्रीकांतची पुढील लढत ली चिया हाओशी तर राजावतची लढत चिनी तैपेईच्या चौ तिएन चेनशी होईल आणि जॉर्ज डेन्मार्कच्या रासमुस गेम्केशी मुकाबला करेल. महिला दुहेरीत त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांनीही शेवटच्या आठमध्ये स्थान मिळविताना आपल्याच देशाच्या प्रिया के.-श्रुती मिश्रा यांना 21-10, 21-12 असे हरविले. त्रीसा-गायत्री यांना येथे आठवे मानांकन मिळाले आहे.

सिंधू, सेन पराभूत

पीव्ही सिंधू मात्र पुन्हा एकदा अपयशी ठरली. तिला जपानच्या 17 वर्षीय कनिष्ठ वर्ल्ड चॅम्पियन तोमोका मियाझाकीकडून 21-16, 19-21, 16-21 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनचे आव्हानही संपुष्टात आले. त्याला ली चिया हाओने 17-21, 15-21 असे केवळ 38 मिनिटात नमविले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article