For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीदुर्गा स्पोर्ट्स हुबळी संघ विजय

10:31 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
श्रीदुर्गा स्पोर्ट्स हुबळी संघ विजय
Advertisement

करडी चषक क्रिकेट स्पर्धा

Advertisement

बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित करडी चषक 14 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात श्रीदुर्गा स्पोर्ट्स हुबळी संघाने टिळकवाडी क्रिकेट अकादमीचा 9 गड्यांनी पराभव केला. श्रेयस आर. याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भगवान महावीर स्कूलच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात टिळकवाडी क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 23 षटकात सर्व गडी बाद 111 धावा केल्या. त्यात कौस्तुभ पाटीलने 4 चौकारांसह 29, पृथ्वी नाईकने 2 चौकारांसह 18 धावा केल्या. हुबळीतर्फे श्रेयस आर. ने 14 धावात 2, हसन रझाकने 21 धावात 2, दैविक मुगाबस्तने 24 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्री दुर्गा स्पोर्ट्सने 20 षटकात 1 गडी बाद 112 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात कार्तिक अगशिमनीने 4 चौकारांसह 44, रचित आर. ने 6 चौकारांसह 36 धावा केल्या. टिळकवाडीतर्फे शरद हेडाने 1 गडी बाद केला.

Advertisement
Advertisement
Tags :

.