For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सौंदत्ती श्री रेणुका यल्लम्मा मंदिर परिसराचा क्षेत्र विकास करण्यात येणार - मंत्री एच के पाटील

05:46 PM Dec 05, 2023 IST | DHANANJAY SHETAKE
सौंदत्ती श्री रेणुका यल्लम्मा मंदिर परिसराचा क्षेत्र विकास करण्यात येणार   मंत्री  एच के पाटील
0966b837-cc31-46ec-a26f-94a7ee3aaa2b.jpeg December 5, 2023
Advertisement

Advertisement

शासनाने राज्यातील महत्त्वाच्या प्रसिद्ध देवस्थान आणि पर्यटन स्थळांचा विकास करण्याची योजना आखली असून सौंदत्ती श्री रेणुका यल्लाम्मा क्षेत्र विकास करण्यात येत आहे. केबल कार प्रकल्प येथे राबविण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन विकास मंत्री एच के पाटील यांनी विधानसभेत बोलताना दिली आहे.

आज मंगळवारी सकाळी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात मूडबिद्रीचे आमदार उमानाथ कोट्यान यांनी मांडलेल्या प्रश्नांला उत्तर देताना एचके पाटील म्हणाले, शासनाने राज्यातील महत्त्वाच्या पुरातन प्रसिद्ध पर्यटन आणि धार्मिक स्थळांची माहिती घेऊन एक विशेष योजना हाती असून धार्मिक, सांस्कृतिक, साहसी, कृषी,पारंपरिक अशा 26 प्रकारच्या पर्यटन प्रकल्पांकडे शासनाने विशेष लक्ष दिले आहे. उत्तर कर्नाटकातील सौंदत्ती येथील रेणुका यल्लम्मा मंदिराला लाखो भाविक दररोज भेट देतात. या ठिकाणी केबल कारचा प्रस्तावही मंजूर करण्यात आल्याची माहिती एच. के. पाटील यांनी सभागृहाला दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.