महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीलंकेचा भारतावर मालिका विजय

06:40 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/कोलंबो

Advertisement

गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेट संघाला लंकेच्या दौऱ्यात वनडे मालिकेत पराभव पत्करावा लागला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत लंकेने भारताचा 2-0 असा पराभव केला. या मालिकेतील बुधवारी येथे खेळविण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात लंकेने भारतावर 110 धावांनी मात केली. या सामन्यात आविश्का फर्नांडो, कुशल मेंडीस यांची अर्धशतके तर वेलालगेचे 5 बळी ही वैशिष्ट्यो ठरली.

Advertisement

या शेवटच्या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50  षटकात 7 बाद 248 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेच्या फिरकी गोलंदाजीसमोर भारताचा डाव 26.1 षटकात 138 धावांत आटोपला.

लंकेच्या डावामध्ये आविश्का फर्नांडोने 102 चेंडूत 2 षटकात आणि 9 चौकारांसह 96 धावा जमविताना निषांकासमवेत सलामीच्या गड्यासाठी 89 धावांची भागिदारी केली. निशांकाने 65 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 45 धावा जमविल्या. निशांका बाद झाल्यानंतर फर्नांडो आणि कुशल मेंडीस यांनी दुसऱ्या गड्यासाठी 82 धावांची भर घातली. कुशल मेंडीसने 82 चेंडूत 4 चौकारांसह 59 धावा जमविल्या. यानंतर लंकेची मधली फळी कोलमडली. कमिंदु मेंडीसने 19 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 23 धावा जमविल्या. लंकेच्या डावात 6 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे रियान परागने 54 धावांत 3 तर मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावामध्ये कर्णधार शर्माने 20 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 35, विराट कोहलीने 4 चौकारांसह 20 , रियान परागने 2 चौकारांसह 15, तर वॉशिंग्टन सुंदरने 25 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 30 धावा जमविल्या. लंकेतर्फे वेलालगेने 27 धावांत 5, तिक्ष्णा व व्हेंडेरेसी यांनी प्रत्येकी 2 तसेच असिता फर्नांडोने 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक: लंका 50 षटकात 7 बाद 248 (अविष्का फर्नांडो 96, कुशल मेंडीस 59, निशांका 45, कमिंदु मेंडीस 23, असालेंका 10 अवांतर 2 रियान पराग 3-54, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर प्रत्येकी 1 बळी), भारत 26.1 षटकात सर्वबाद 138 धावा (शर्मा 35, कोहरी 20, पराग 15, वॉशिंग्टन सुंदर 30 अवांतर 1, वेलालगे 5-27, तिक्ष्णा 2-45, व्हेंडेरेसी 2-34, असिता फर्नांडो 1-29)

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article