महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लंकेचा इंग्लंवर आठ गड्यांनी दणदणीत विजय

06:15 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पी. निशांका ‘सामनावीर’, जो रुट ‘मालिकावीर’, इंग्लंडचा मालिका विजय

Advertisement

वृत्तसंस्था/लंडन

Advertisement

पी. निशांकाच्या दमदार नाबाद शतकाच्या जोरावर लंकन संघाने सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवशी यजमान इंग्लंडचा तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत आठ गड्यांनी दणदणीत पराभव करत आपला संभाव्य व्हाईटवॉश टाळला. इंग्लंडने ही मालिका 2-1 अशी जिंकली. इंग्लंडच्या जो रुटला ‘मालिकावीर’ तर लंकेच्या निशांकाला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.

या शेवटच्या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 325 धावा जमविल्यानंतर लंकेचा पहिला डाव 263 धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडने पहिल्या डावात 62 धावांची आघाडी मिळविली. इंग्लंडच्या पहिल्या डावात कर्णधार पॉपने दीड शतक तर डकेटने अर्धशतक झळकविले. लंकेच्या पहिल्या डावात कर्णधार धनंजय डिसिल्वा, कमिंदु मेंडीस आणि पी. निशांका यांनी अर्धशतके नोंदविली. लंकेच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा दुसरा डाव केवळ 156 धावांत आटोपला. जेमीस्मिथने एकाकी लढत देत 50 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 67 धावा जमविल्या. लॉरेन्सने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 35, रुटने 2 चौकारांसह 12 तर स्टोनने 1 चौकारांसह 10 धावा जमविल्या. लंकेतर्फे कुमाराने 21 धावांत 4 तर विश्वा फर्नांडोने 40 धावांत 3 तसेच असिता फर्नांडोने 49 धावांत 2 आणि रत्ननायकेने 43 धावांत 1 गडी बाद केला. इंग्लंडकडून लंकेला विजयासाठी 219 धावांचे आव्हान मिळाले.

लंकन संघाने आपल्या दुसऱ्या डावाला दमदार सुरूवात केली होती. 1 बाद 94 या धावसंख्येवरुन त्यांनी सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवसाला पुढे प्रारंभ केला. सलामीचा करुनारत्ने केवळ 8 धावांवर झेलबाद झाल्यानंतर पी. निशांका आणि कुशल मेंडीस यांनी दुसऱ्या गड्यासाठी 69 धावांची भागिदारी केली. इंग्लंडच्या अॅटकिनसनने कुशल मेंडीसला झेलबाद केले. त्याने 37 चेंडूत 7 चौकारांसह 39 धावा जमविल्या. एका बाजुने निशांकाने चिवट फलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात महत्वाचा वाटा उचलला. निशांका आणि मॅथ्युज यांनी तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 111 धावांची भागिदारी केली. पी. निशांकाने 124 चेंडूत 2 षटकार आणि 13 चौकारांसह नाबाद 127 तर मॅथ्युजने 61 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 32 धावा जमविल्या. सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवशी निशांकाने आपले शतक 107 चेंडूत 11 चौकारांच्या मदतीने झळकविले. लंकेने दुसऱ्या डावात 40.3 षटकात 2 बाद 219 धावा जमवित विजय नोंदविला. इंग्लंडतर्फे वोक्स आणि अॅटकिनसन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात लंकन संघाला खराब कामगिरीमुळे पराभव पत्करावा लागला होता. पण त्यांनी शेवटच्या कसोटीत इंग्लंडवर विजय मिळविण्यात यश संपादन केले. गेल्या 40 वर्षांच्या कालावधीत या दोन संघामध्ये 21 कसोटी सामने खेळविले गेले असून लंकेचा हा इंग्लंडवरील चौथा विजय आहे. तब्बल 10 वर्षांपूर्वी लंकेने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा 1-0 असा पराभव केला होता. या मालिकेनंतर आता लंकेचा इंग्लंड दौरा संपुष्टात आला आहे. आता इंग्लंडची टी-20 मालिका ऑस्ट्रेलियाबरोबर येत्या बुधवारपासून खेळविली जाणार आहे. लंकेने सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवशी केवळ दोन तासांच्या कालावधीत इंग्लंडवर विजय मिळविला. निशांकाचे हे कसोटीतील दुसरे शतक आहे.

संक्षिप्त धावफलक: इंग्लंड प. डाव - 69.1 षटकात सर्वबाद 325, लंका प. डाव 61.2 षटकात सर्व बाद 263, इंग्लंड दु. डाव- 34 षटकात सर्वबाद 156 (स्मिथ 67, लॉरेन्स 35, रुट 12, स्टोन 10, कुमारा 4-21, विश्वा फर्नांडो 3-40, असिता फर्नांडो 2-49, रत्ननायके 1-43), लंका दु. डाव 40.3 षटकात 2 बाद 219 (पी. निशांका नाबाद 127, करुनारत्ने 8, कुशल मेंडीस 39, मॅथ्युज नाबाद 32, अवांतर 13, अॅटकिनसन व वोक्स प्रत्येकी 1 बळी)

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article