महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लंकेच्या करुणारत्नेची निवृत्तीची घोषणा

06:16 AM Feb 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
featuredImage featuredImage
Advertisement

वृत्तसंस्थ / गॅले

Advertisement

लंकेचा माजी कर्णधार आणि भवशाचा फलंदाज 36 वर्षीय दिमुथ करुणारत्नेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपल्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत. येत्या गुरुवारपासून येथे लंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटीला प्रारंभ होणार आहे. करुणारत्नेची ही 100 वी कसोटी आहे. या शतकी कसोटीनंतर तो निवृत्तीची घोषणा करणार आहे.

Advertisement

करुणारत्नेने आपल्या जवळपास 14 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत आतापर्यंत 99 कसोटीत 16 शतके आणि 34 अर्धशतकांसह 7172 धावा जमविल्या आहेत. तसेच त्याने 50 वनडे सामन्यात लंकेचे प्रतिनिधीत्व करताना 1 शतक आणि 11 अर्धशतकांसह 1316 धावा जमविल्या आहेत. 2012 साली करुणारत्नेने कसोटी पदार्पण केले होते. आयसीसीची विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धा सुरू झाल्यानंतर लंकेला फारशा द्विपक्षीय कसोटी मालिका खेळण्याची संधी मिळाली नाही. येत्या गुरुवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणारी कसोटी ही करुणारत्नेची 100 वी कसोटी आहे. 2008 साली करुणारत्नेने एसएससी क्लबकडून आपले प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसांचा क्लब स्तरीय सामनाहोणार असून या सामन्यात करुणारत्ने आपला शेवटचा सहभाग दर्शविणार आहे. लंकंन संघातील ज्येष्ठ खेळाढु अँजेलो मॅथ्युज तसेच दिनेश चंडीमल यांच्याशी चर्चा करुनच मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतल्याचे करुणारत्नेने सांगितले. करुणारत्ने अलिकडच्या कालावधीत फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने पहिल्या डावात 7 तर दुसऱ्या डावात 0 धावा जमविल्या. कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा आणि 100 कसोटी खेळण्याचे स्वप्न प्रत्येक क्रिकेटपटू बाळगत असतो. पण मला यापैकी 100 कसोटीचे स्वप्न साकार करता आले याबद्दल मी समाधानी असल्याचे करुणारत्नेने म्हटले आहे. लंकेतर्फे 100 कसोटी खेळणारा करुणारत्ने हा सातवा क्रिकेटपटू आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia