For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंबई इंडियन्स अंतिम फेरीत दाखल

06:10 AM Mar 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
मुंबई इंडियन्स अंतिम फेरीत दाखल
Advertisement

सामनावीर हिली मॅथ्युज, नॅट सिव्हेर ब्रंट यांची अर्धशतके, गुजरात पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था/मुंबई

हिली मॅथ्युज आणि नॅट सिव्हेर ब्रंट यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर गुरुवारी येथे खेळविण्यात आलेल्या एलिमनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 4 चेंडू बाकी ठेवून 47 धावांनी दणदणीत पराभव करत महिलांच्या प्रिमीयर लीग टी-20 स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आता मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात जेतेपदासाठी लढत शनिवार दि. 15 मार्च रोजी होणार आहे. या सामन्यात गुजरात जायंट्सने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी दिली. मुंबईने 20 षटकात 4 बाद 213 धावा जमवित गुजरातला विजयासाठी 214 धावांचे कठीण आव्हान दिले. पण मुंबईची अचूक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररणासमोर गुजरातचा डाव 19.2 षटकात 166 धावांत आटोपला.

Advertisement

मुंबईच्या डावामध्ये हिली मॅथ्युजर आणि नॅट सिव्हेर ब्रंट यांनी अर्धशतके झळकविताना दुसऱ्या गड्यासाठी 133 धावांची शतकी भागिदारी केली. सलामीची फलंदाज भाटीयाने 14 चेंडूत 3 चौकारांसह 15 धावा जमविताना मॅथ्युज समवेत 26 धावांची भर घातली. कर्णधार हरमनप्रित कौरने आक्रमक फलंदाजी करताना केवळ 12 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह 36 धावा झोडपल्या.

मॅथ्युजने 50 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारांसह 77 तर नॅट सिव्हर ब्रंटने 41 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांसह 77 धावा जमविल्या. मुंबईच्या डावामध्ये 9 षटकार आणि 25 चौकार नोंदविले गेले. गुजराततर्फे गिब्सनने 2 तर गौतमने 1 गडी बाद केला. मुंबईने पॉवरप्ले दरम्यान 6 षटकात 37 धावा जमविताना 1 गडी गमविला. मुंबईचे अर्धशतक 42 चेंडूत, शतक 66 चेंडूत, दीड शतक 92 चेंडूत आणि द्वितीय 115 चेंडूत फलकावर लागले. मॅथ्युजने 8 चौकार आणि 1 षटकारसह 36 चेंडूत तर नॅट सिव्हेर ब्रंटने 7 चौकार आणि 1 षटकारासह 29 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना गुजरातच्या डावामध्ये एकेरी धावा घेताना योग्य ताळमेळ नसल्याने गुजरातचे तीन फलंदाज धावचीत झाले. गिब्सनने 24 चेंडूत 1 षटकार आण 5 चौकारांसह 34, भारती फुलमालीने 20 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 30, लिचफिल्डने 20 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 31, मुनीने 1 चौकारासह 6, देवोलने 1 चौकारासह 8, गार्डनरने 1 षटकारासह 8, गौतमने 1 चौकारासह 4, शेखने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17, कंवरने 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. गुजरातच्या डावात 5 षटकार आणि 19 चौकार नेंदविले गेले. गुजरातचे अर्धशतक 40 चेंडूत, शतक 66 चेंडूत तर दीड शतक 98 चेंडूत फलकावर लागले. पॉवरप्ले दरम्यान त्यांनी पहिल्या 6 षटकात 46 धावा जमविताना तीन गडी गमविले. मुंबई इंडियन्सतर्फे मॅथ्युजने 31 धावांत 3, अॅमेलिया केरने 28 धावांत 2 तर इस्माईल आणि ब्रंट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

मुंबई इंडियन्स 20 षटकात 4 बाद 213 (मॅथ्युज 77, ब्रंट 77, हरमनप्रित कौर 36, भाटीया 15, अवांतर 7, गिब्सन 2-40, गौतम 1-30), गुजरात जायंट्स 19.2 षटकात सर्वबाद 166 (गिब्सन 34, फुलमाली 3, लिचफिल्ड 31, शेख 17, कंवर 16, अवांतर 7, मॅथ्युज 3-31, केर 2-28, इस्माईल आणि ब्रंट प्रत्येकी 1 बळी)

Advertisement
Tags :

.