कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लंकन महिला संघ 5 गड्यांनी विजयी

06:48 AM May 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

द. आफ्रिकाचा पराभव, हर्षिता समरविक्रमा सामनावीर

Advertisement

वृत्तसंस्था / कोलंबो

Advertisement

महिलांच्या तिरंगी वनडे मालिकेतील येथे खेळविण्यात आलेल्या तिसऱ्या सामन्यात यजमान लंकेने द. आफ्रिकेचा 21 चेंडू बाकी ठेवून 5 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात 93 चेंडूत 77 धावा झळकविणाऱ्या हर्षिता समरविक्रमाला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून द. आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. द. आफ्रिकेने 50 षटकात 9 बाद 235 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेने 46.3 षटकात 5 बाद 237 धावा जमवित विजय नोंदविला.

द. आफ्रिकेच्या डावात डर्कसनने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 60 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 61 धावा जमविल्या. गुडॉलने  63 चेंडूत 5 चौकारांसह 46, सुने लुसने 39 चेंडूत 3 चौकारांसह 31, ट्रॉयॉनने 40 चेंडूत 4 चौकारांसह 35, डी. क्लर्कने 2 चौकारांसह 17, ब्रिट्सने 2 चौकारांसह 14 आणि कर्णधार वूलव्हर्टने 1 चौकारांसह 10 धावा केल्या. द. आफ्रिकेच्या डावात 1 षटकार आणि 22 चौकार नोंदविले गेले. लंकेतर्फे मालती मदारा हिने 50 धावांत 4 तर विहानगाने 41 धावांत 3 तसेच सुगंधीका कुमारी आणि रणवीरा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. द. आफ्रिकेने पहिल्या पॉवरप्ले दरम्यान 10 षटकात 40 धावा जमविताना दोन गडी गमविले. डर्कसनने 53 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावात हर्षिता समरविक्रमाने 93 चेंडूत 8 चौकारांसह 77 धावा झळकविल्या. कविशा दिलहारीने 75 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 61 धावा झोडपल्या. सलामीच्या हसिनी परेराने 55 चेंडूत 6 चौकारांसह 42 तर गुणरत्नेने 5 चौकारांसह 29 धावा केल्या. निलक्षिका सिल्व्हाने दोन चौकारांसह नाबाद 11 धावा जमविल्या. परेरा आणि गुणरत्ने याने दुसऱ्या गड्यासाठी 69 धावांची भागिदारी केली. समरविक्रमा आणि दिलहारी यांनी चौथ्या गड्यासाठी 128 धावांची शतकी भागदारी नोंदविली. लंकेच्या डावात 1 षटकार आणि 28 चौकार नोंदविले गेले. लंकेने पहिल्या पॉवरप्ले दरम्यान 10 षटकात 47 धावा जमविताना एक गडी गमविला. दिलहारीने 61 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह तर समरविक्रमाने 65 चेंडूत 5 चौकारांसह अर्धशतक झळकविले. द. आफ्रिकेतर्फे मलाबाने 44 धावांत 2 तर क्लास, डी. क्लर्क आणि लूस यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.

संक्षिप्त धावफलक: द. आफ्रिका 50 षटकात 9 बाद 235 (डर्कसन नाबाद 61, गुडॉल 46, लुस 31, ट्रायॉन 35, डी. क्लर्क 17, ब्रिट्स 14, वूलव्हर्ट 10, मदारा 4-50, विहांगा 3-41, सुगंधीका कुमारी व रणवीरा प्रत्येकी 1 बळी), लंका 46.3 षटकात 5 बाद 237 (हर्षिता समरविक्रमा 77, दिलहारी 61, हसिनी परेरा 42, गुणरत्ने 29, सिल्व्हा नाबाद 11, मलाबा 2-44, क्लास, डी. क्लर्क, लुस प्रत्येकी 1 बळी)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article