महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

श्रीलंकेचा बांगलादेशवर 328 धावांनी विजय

06:35 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कर्णधार धनंजय डिसिल्व्हा सामनावीर : रजिताचे पाच बळी,

Advertisement

वृत्तसंस्था/ सिलेत

Advertisement

श्रीलंकेने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवशी विजयी सलामी देताना पहिल्या सामन्यात यजमान बांगलादेशचा 328 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात लंकेचा कर्णधार धनंजय डिसिल्व्हाला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. तसेच बांगलादेशच्या दुसऱ्या डावात कसुन रजिताने 56 धावांत 5 गडी बाद केले. या मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी चेतोग्राम येथे 30 मार्चपासून खेळविली जाईल.

या पहिल्या कसोटीत लंकेचा पहिला डाव 280 धावांत आटोपल्यानंतर बांगलादेशने पहिल्या डावात 188 धावा जमविल्या. लंकेने 92 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात भक्कम फलंदाजी केली. लंकेने दुसऱ्या डावात 418 धावा जमवित बांगलादेशला निर्णायक विजयासाठी 511 धावांचे कठिण आव्हान दिले. लंकेच्या पहिल्या डावात कर्णधार धनंजय डिसिल्व्हा आणि कमिंदू मेंडीस यांनी शतके झळकवली होती. तर लंकेच्या दुसऱ्या डावात धनंजय डिसिल्व्हा आणि कमिंदू मेंडीस यांनी पुन्हा दमदार शतके नोंदवून 418 धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यामध्ये डिसिल्व्हा आणि मेंडीस यांनी सलग दोन शतके झळकाविली. लंकेच्या दुसऱ्या डावात मेहदी हसन मिराजने 4 तर नाहीद राणा आणि ताजुल इस्लाम यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

लंकेच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशला दुसऱ्या डावातही मोठी धावसंख्या नोंदविता आली नाही. बांगलादेशने 5 बाद 47 या धावसंख्येवरुन सोमवारी चौथ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. आणि त्यांचे शेवटचे 5 गडी 139 धावांची भर घालत तंबूत परतले. बांगलादेशच्या दुसऱ्या डावात मोमीनुल हक्कने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 148 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह नाबाद 87 धावा जमविल्या. तसेच मेहदी हसन मिराजने 50 चेंडूत 6 चौकारांसह 33 धावा केल्या. हक्क आणि मिराज यांनी सातव्या गड्यासाठी 66 धावांची भागिदारी केली. बांगलादेशच्या फलंदाजांनी आपला पराभव लांबविण्याचा प्रयत्न केला. पण चहापानापूर्वीच त्यांचा डाव आटोपला. उपहारावेळी बांगलादेशने 7 बाद 129 धावा जमविल्या होत्या. लंकेतर्फे रजिताने 56 धावांत 5, विश्वा फर्नांडोने 36 धावांत 3 तर उमाराने 39 धावांत 2 गडी बाद केले. विश्वा फर्नांडोने बांगलादेशच्या पहिल्या डावात 4 बळी घेत एकूण या सामन्यात 7 गडी बाद केले. तर रजिताने या सामन्यात 8 बळी मिळविले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये एका सामन्यात दोन्ही डावात एकाच जोडीने सलग शतके नोंदविण्याची ही तिसरी वेळ आहे.

संक्षिप्त धावफलक - लंका प. डाव सर्व बाद 280, बांगलादेश प. डाव सर्व बाद 188, लंका दु. डाव सर्व बाद 418, बांगलादेश दु. डाव 49.2 षटकात सर्व बाद 182 (मोमिनुल हक्क नाबाद 87, झाकिर हसन 19, मेहदी हसन मिराज 33, एस. इस्लाम 12, अवांतर 19, के. रजिता 5-56, विश्वा फर्नांडो 3-36, कुमारा 2-39).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article